ETV Bharat / state

पिंपरी-चिंचवड शहरात पुण्यातील महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू; दिवसभरात आढळले 41 रुग्ण

पिंपरी-चिंचवड शहरात सोमवारी रात्री उशिरापर्यंत आलेल्या अहवालात एकूण 41 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले आहे. तर पुण्यातील एका महिलेचा महानगर पालिकेच्या रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झालेला आहे. दिलासादायक बाब म्हणजे १७० जण कोरोनामुक्त झालेले आहेत.

Pimpri chinchawad corona
पिंपरी-चिंचवड कोरोना
author img

By

Published : May 26, 2020, 10:43 AM IST

पिंपरी-चिंचवड (पुणे) - सोमवारी शहरात दिवसभरात 41 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. यात शहराबाहेरील तीन रुग्णांचा समावेश आहे. त्यामुळे शहरातील बाधितांची संख्या 391 वर पोहोचली आहे. पुण्यातील येरवडा परिसरात राहणाऱ्या महिलेचा पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या रुग्णालयात उपचार घेत असताना मृत्यू झाला आहे. आजपर्यंत शहराबाहेरील एकूण १० जणांचा मृत्यू कोरोनामुळे झालेला आहे. तर शहरातील ७ जणांचा मृत्यू झाला आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात सोमवारी रात्री उशिरापर्यंत आलेल्या अहवालात एकूण 41 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले आहे. तर पुण्यातील एका महिलेचा महानगर पालिकेच्या रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झालेला आहे. दिलासादायक बाब म्हणजे १७० जण कोरोनामुक्त झालेले आहेत. दरम्यान, सोमवारी आढळलेले रुग्ण हे आनंदनगर चिंचवड, बौध्दनगर पिंपरी, राजगुरुनगर, किवळे, भाटनगर, सांगवी, येरवडा, रुपीनगर, काकडेपार्क, चिंचवड, वाकड, पिंपळे सौदागर, काळेवाडी, भाटनगर येथील रहिवासी आहेत.

शहरातील हा परिसर सोमवारी मध्यरात्रीपासून 'सील'

ढोरे नगर, जुनी सांगवी येथील ( राज मसाले - योगिता जनरल स्टोअर - ढोरे नगर लेन नं.१ - जैन मंदिर - सुमनश्री अपार्टमेंट - ढोरे नगर लेन नं.२ - आनंद सुपर मार्केट - शुभयोग मंगल कार्यालय - राज मसाले ) व सहयोगनगर, रुपीनगर येथील ( ओंकार जनरल स्टोअर - बालाजी प्रिंटर्स - नॅशनल गॅरेज - त्रिवेणीनगर रोड - अक्षय जनरल स्टोअर्स - गणेश इलेट्रिकल्स - ओंकार जनरल स्टोअर ) हा परिसर सोमवारी मध्यरात्रीपासून पुढील आदेशापर्यंत सील करण्यात आला आहे. सदर परिसराच्या हद्दींमध्ये पुढील आदेशापर्यंत प्रवेशबंदी व परिसरातून बाहेर पडण्यास नागरिकांना बंदी केलेली आहे. सील केलेल्या परिसरातील प्रत्येक नागरिकाने तोंडाला मास्क लावणे बंधनकारक आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.