बारामती - पोलीस रेकॉर्डवर असणाऱ्या गुंडाने त्याच्या दहशतीच्या जोरावर एका महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना बारामती शहरात घडली. याप्रकरणी गुंड रोहित केशव जगताप (वय 28 वर्ष) रा.कसबा,ता.बारामती) याच्यावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी त्याला तात्काळ अटक केली आहे.
काय आहे प्रकरण - पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बारामती शहर पोलीस ठाण्याच्या अभिलेखावरील गुंड रोहित जगताप याने बारामतीमधीलच एका महिलेच्या मुलाचे अपहरण करून मारून टाकण्याची धमकी दिली. तसेच सदर महिलेला कोणी जवळचे नातेवाईक नाही. याचा फायदा घेत आरोपी रोहित जगताप याने स्वतःच्या असणाऱ्या दहशतीच्या जोरावर मोरगाव रोडच्या सिकंदर नगर भागात सदर महिलेला बोलून आरोपी रोहित जगताप याने त्याठिकाणी काटेरी झुडपांमध्ये सदर महिलेवर लैंगिक अत्याचार केला. सदर महिला ज्या ठिकाणी काम करते त्या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी गोंधळ घालत त्याची इच्छापूर्ती करण्याची मागणी केली. याला सदर महिलेने नकार दिला असता तिच्या घरी जाऊन तिच्या दरवाज्याची तोडफोड केली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
आरोपीला दोन दिवसांची पोलीस कोठडी - सदर महिलेने कोणतीही तमा न बाळगता पोलीस स्टेशन गाठून वरील हकिकत सांगितली. पोलिसांनी तात्काळ घटनेचे गांभीर्य ओळखून आरोपी रोहित जगताप याला तात्काळ ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध कलम 376, 427, 506, 504 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. सदर आरोपीला दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
पोलीस पथकाची कारवाई - या गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनील महाडिक, पोलीस उपनिरीक्षक गणेश पाटील, उपनिरीक्षक युवराज घोडके तसेच पोलीस हवालदार शिंदे, इंगळे हे करत आहेत.
हेही वाचा - Sidhu Musewala Murder Pune Connection : शार्प शूटर संतोष जाधव हा गवळी गँगचा प्यादा!