ETV Bharat / state

पुण्यात औषध व्यावसायिकाची गळफास घेऊन आत्महत्या - पुणे व्यावसायिक आत्महत्या न्यूज

आठ दिवसापूर्वी व्यावसायिक गौतम पाषाणकर हे आपल्या गाडी चालकाकडे आत्महत्येची चिठ्ठी ठेवून बेपत्ता झाले आहेत. त्यांचा अद्याप शोध लागलेला नाही. याच दरम्यान शहरातील एका औषध व्यावसायिकाने आत्महत्या केल्याची घटना घडली.

suicide
आत्महत्या
author img

By

Published : Oct 29, 2020, 6:38 PM IST

पुणे - डेक्कन परिसरात एका व्यावसायिकाने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना समोर आली. जयंत राजपूत(वय ५४) असे नाव असलेली ही व्यक्ती औषधांचा व्यवसाय करते. विधी महाविद्यालय(लॉ कॉलेज)रस्त्यावर असलेल्या त्यांच्या कार्यालयात काल रात्री त्यांचा मृतदेह आढळला.

डेक्कन पोलिसांना घटनास्थळी सुसाईड नोट सापडली आहे. त्यात राजपूत यांनी आर्थिक अडचणीतून आत्महत्या करत असल्याचे नमूद केले आहे. सोबतच त्यांनी दोन व्यक्तींची नावेही त्यात लिहिली आहेत. मृत राजपूत यांची पत्नी काँग्रेसच्या माजी नगरसेवक आहेत.

सामान्यपणे दररोज सायंकाळी सहा वाजता जयंत राजपूत कार्यालयातून घरी जातात. काल (बुधवारी) रात्री नऊ वाजले तरी ते घरी पोहचले नाही. म्हणून त्यांच्या मुलाने त्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी फोन उचलला नाही. म्हणून त्यांच्या मुलाने कार्यालयात जाऊन पाहिले. कार्यालयाचा मुख्य दरवाजा आतून बंद असल्याने त्याने मागचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला. त्याला राजपूत फॅनला लटकल्याचे दिसले, अशी माहिती डेक्कन जिमखान्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राम राजमाने यांनी दिली.

व्यावसायिक गौतम पाषाणकरही आहेत बेपत्ता -

शहरातील व्यावसायिक गौतम पाषाणकर हे आपल्या गाडी चालकाकडे आत्महत्येची चिठ्ठी ठेवून बेपत्ता झाले आहेत. ऑटोमोबाईल क्षेत्रातील प्रसिद्ध पाषाणकर ग्रुपचे ते व्यवस्थापकीय संचालक आहेत. याप्रकरणी त्यांचे पुत्र कपिल पाषाणकर यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दिली आहे. व्यवसायात मोठे नुकसान झाल्याचे सुसाईड नोटमध्ये नमूद केले आहेत. गौतम पाषाणकर बेपत्ता होऊन आठवडा उलटला आहे. मात्र, अजूनही त्यांचा शोध लागलेला नाही. दरम्यान, पाषाणकर यांचा मुलगा कपिल याने आर्थिक अडचणीच्या सर्व शक्यता नाकारल्या आहेत. आम्ही कोणत्याही आर्थिक अडचणीत नसून 150 कोटी रुपयांचे कर्जही फेडून टाकल्याचे कपिल यांनी म्हटले आहे. त्यामुळे या प्रकरणातील गुंतागुंत आणखी वाढली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.