ETV Bharat / state

राजगुरुनगरात कंटेन्मेंट, बफर झोन करुनही नागरिक रस्त्यावर; कोरोनाचा समूह संसर्ग वाढण्याची भिती ?

राक्षेवाडीतील दोन वार्ड कंटेन्मेंट झोन तयार करुन सिमा सिल करण्यात आल्या आहेत. तर राजगुरूनगर शहर बफर झोन करण्यात आले आहे. पोलीस दल नागरिकांच्या सुरक्षेसाठी काम करत आहे. मात्र, नागरिकांना कुठलेच गांभिर्य राहिले नसून मोठ्या संख्येने ते बाहेर पडत आहेत.

police
जनतेला घरात राहण्याचे आवाहन करताना पोलीस
author img

By

Published : May 18, 2020, 12:27 PM IST

पुणे - राजगुरुनगर परिसरात पाच रुग्ण आढळून आल्यानंतर नागरिक घराबाहेर पडत आहेत. पोलीस दलातील जवान दिवसरात्र गर्दी होऊ नये, यासाठी मेहनत घेऊन नागरिकांनी घराबाहेर न पडण्याचे आवाहन करत आहेत. घराबाहेर पडणारे समाजकंठक बेजबाबदारपणे वावरत असल्याचे पोलीस निरिक्षक अरविंद चौधरी यांनी सांगितले.

जनतेला घरात राहण्याचे आवाहन करताना पोलीस

कोरोनाचा समूह संसर्ग रोखण्यासाठी कमी मनुष्यबळावर पोलीस दल नागरिकांच्या सुरक्षेसाठी काम करत आहे. मात्र नागरिकांना कुठलेच गांभिर्य राहिले नसून मोठ्या संख्येने ते बाहेर पडत आहेत. राक्षेवाडीतील दोन वार्ड कंटेन्मेंट झोन तयार करुन सिमा सिल करण्यात आल्या आहेत. तर राजगुरूनगर शहर बफर झोन करण्यात आले आहे. राजगुरुनगर शहर व परिसरात नागरिकांचा रसत्यावरील वावर वाढला तर कोरोनाचा समूह संसर्ग वाढण्याची भिती व्यक्त केली जात आहे.

गेल्या दोन महिन्यापासून कोरोनाचा समूह संसर्ग रोखण्यासाठी सुट्टी न घेता पोलीस रस्त्यावर बंदोबस्त करत आहेत. कोरोनाचा संसर्ग पसरु नये, यासाठी पोलीस दल लढत आहे, तर नागरिक बेजबाबदारपणे बाहेर पडत असल्याची खंतही पोलीस व्यक्त करत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.