ETV Bharat / state

'शाळेने नवी इमारत बांधली आणि चक्क 200 टक्के फी वाढवली'; पिंपरीत पालकांचे आंदोलन - पुणे लेटेस्ट न्यूज

School 200 Percent Fees Increased : पिंपरी-चिंचवड येथील पिंपळे गुरवमधील द मिलेनीअम शाळेने 15 हजारावरून थेट 45 हजार रुपये फी वाढ केली. फी वाढ करताना पालकांना शाळा प्रशासनाने विश्वासात घेतले नाही असा आरोप पालकांनी केलाय. फी वाढीचा पालकांनी निषेध केला. सर्वसामान्य व्यक्तींना फी वाढ परवडत नसल्याचं त्यांनी म्हटलंय. ( Pimpri Chinchwad Parents agitation )

Pimpri Chinchwad School Fees Increased
पिंपरीत पालकांचे आंदोलन
author img

By

Published : Jun 1, 2022, 1:42 PM IST

Updated : Jun 1, 2022, 1:53 PM IST

पिंपरी-चिंचवड (पुणे) - पिंपरी-चिंचवडमध्ये खासगी शाळेने तिप्पट फी वाढ केल्याने पालकांनी संताप व्यक्त केला ( Pimpri Chinchwad Parents agitation ) आहे. पिंपळे गुरवमधील द मिलेनीअम शाळेने 15 हजारावरून थेट 45 हजार रुपये फी वाढ केली. फी वाढ करताना पालकांना शाळा प्रशासनाने विश्वासात घेतले नाही असा आरोप पालकांनी ( School 200 Percent Fees Increased ) केलाय. फी वाढीचा पालकांनी निषेध केला. सर्वसामान्य व्यक्तींना फी वाढ परवडत नसल्याचं त्यांनी म्हटलंय. मिलेनीअम शाळेच्या मुख्यद्यापीकेशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

पिंपरीत पालकांचे आंदोलन

इमारत बांधली आणि फी वाढवली - पालकांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, पहिली शाळा वेगवेगळ्या जागेवर भरत होती. त्यानंतर शाळेने आता नवी इमारत बांधली आणि चक्क 200 टक्कांनी फीस वाढवली आहे. ही फीस सामान्य घरातील नागरिकांच्या आवाक्या बाहेरील आहे. त्यामुळे शासकिय नियमाप्रमाणे फक्त प्रशासनाने 15 टक्के फीस वाढ करावी. अशी मागणी आमची आहे.

हेही वाचा - 8 year Child Commits Suicide : मोबाईलमधील हॉरर व्हिडिओ ठरला जीवघेणा : आठ वर्षीय मुलाने बाहुलीला कैद्यासारखी फाशी देऊन घेतला गळफास

15 हजारावरून फी केली 45 हजार - पिंपरी चिंचवडमधील न्यू मिलेनियम इंग्लिश मिडीयम शाळेविरोधात पालकांनी आवाज उठवला आहे. शाळेने अवाजवी फी वाढ केल्याने पालक संतप्त झालेत. गेल्या वर्षी अवघी पंधरा हजार असणारी फी यंदा थेट 45 हजार केल्याचा आरोप पालकांनी केलाय. सर्व पालकांना अंधारात ठेऊन शाळेने हा कारभार सुरु केलाय, जो पालकांना न पेलवणारा आहे. म्हणून ही फी वाढ मागे घेण्याची ते विनवणी करतायेत. गेल्या काही दिवसांपासून शाळेशी संवाद सुरुये मात्र शाळा प्रशासन फी वाढीवर ठाम आहे. त्यामुळेच पालकांनी आज शाळेसमोर आंदोलन केले. याबाबत शाळा प्रशासनाशी बाजू जाणून घेण्यासाठी आम्ही गेलो असता शाळेत कोणी नाहीत असे उत्तर गेट वरील सुरक्षा रक्षकांनी दिल आहे.

हेही वाचा - केकेच्या मृत्यूपूर्वीचा व्हिडिओ व्हायरल, गाताना स्टेजवरुन असा निघाला होता गायक

Last Updated : Jun 1, 2022, 1:53 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.