पुणे : पुणे तिथं काय उणे हे नेहेमीच म्हणत आलो आहे. याची प्रचिती देखील वेळोवेळी आपल्याला पाहायला मिळाली आहे. म्हणतात ना जे पुण्यात पिकत ते जगभर विकल जात आणि पुण्यात कधी काय होईल हे देखील सांगता येत नाही. असे काहीस प्रकार पुण्यात घडला आहे. पुणेकर तसे जेवायच्या बाबतीत अगदी चविष्ट असतात. जेवण आवडलेच तरच ते सांगतात की, खूपच चांगले जेवण आहे. नाहीतर तोंडावरच नाही म्हणून सांगतात. असे काहीस एका स्पर्धेत झाले आहे.
पाणी पुरी खाणे स्पर्धेचे आयोजन: पुण्यातील मध्यवस्ती असलेल्या कसबा पेठेत झालेल्या या स्पर्धेत ३ हजार ५०० महिलांनी सहभाग घेतला. यामध्ये चक्क ५ हजार प्लेट पाणीपुरी फस्त केली. प्रल्हाद गवळी मित्र परिवार तर्फे कसबा पेठेतील आर.सी.एम.गुजराथी हायस्कूल येथे महिलांसाठी पाणी पुरी खाण्याच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत अगदी सहा वर्षाच्या चिमुकलीपासून ते ऐंशी वर्षाच्या आजींपर्यंत सर्वच वयोगटातील महिलांनी सहभाग घेतला होता.
सर्वच वयोगटातील महिला सहभागी : शहराच्या मध्यवस्तीमध्ये असलेल्या कसबा पेठमध्ये अस्सल पुणेकर राहतात. या ठिकाणच्या महिला या मोठ्या प्रमाणावर सर्वसामान्य महिला असून चूल आणि मुल याभोवतीच त्यांचे जीवनमान असते. अश्या या महिलांनाही मनसोक्त पाणी पुरी खाण्याचा आनंद मिळावा याकरिता हा उपक्रम राबविण्यात आला होता. यात सर्वच वयोगटातील महिला हे सहभागी झाले होते. विशेष म्हणजे या महिलांना या स्पर्धेत बक्षीस देखील देण्यात आले.
पाणीपुरी खाण्याचा आनंद केला व्यक्त : माहिलांनी सांगितले की, गेल्या अनेक वर्षापासून आम्ही इथे राहतो. आमचा पूर्ण वेळ हा घरातील काम तसेच कुटुंबाबरोबरच जातो. कधी तरी आमच्या भागातील महिला आम्ही एकत्र येतो. आता जो पाणी पुरी खाण्याचा उपक्रम घेतला आहे, त्यात आम्ही एकत्र आलो आहे. या ठिकाणी सर्वच मैत्रिणी बरोबर पाणी खाऊन विविध खेळ खेळून खूप आनंद झाला आहे. विशेष म्हणजे कितीही पाणी पुरी खाण्याचा आनंदच खूप वेगळा असल्याचे यावेळी काही महिलांनी सांगितले.
हेही वाचा: पिंपरीचिंचवडमध्ये ऑटोमॅटिक मशीनची पाणीपुरी हायजिनिक चाटची ग्राहकांना भुरळ