ETV Bharat / state

Osho Sambodhi Day Pune : पुण्यातील ओशो आश्रमामध्ये पुन्हा भक्त आक्रमक; पोलिसांनी लाठीचार्ज केल्याचा आरोप, पाहा व्हिडिओ - Sambodhi Day Pune

ओशो संबोधी दिवसानिमित्त हजारो ओशो शिष्य पुण्यातील आश्रम परिसरात दाखल झाले आहेत. आज पुन्हा भक्तांनी आश्रमात जाण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी माळ घातली असल्यामुळे त्यांना प्रवेश देण्यास नकार देण्यात आला. यावरून ओशो भक्त आक्रमक झाले होते. दरम्यान, पोलिसांनी लाठीचार्ज केल्याचा आरोप ओशो भक्तांनी केला आहे.

Osho Sambodhi Day Pune
पुण्यातील ओशो आश्रमामध्ये पुन्हा भक्त आक्रमक
author img

By

Published : Mar 22, 2023, 8:20 PM IST

पुण्यातील ओशो आश्रमामध्ये पुन्हा भक्त आक्रमक

पुणे : आचार्य रजनीश ओशो यांचा काल (21 मार्च) 70 वा संबोधी दिवस होता. या पार्श्वभूमीवर जगभरातून अडीच ते तीन हजार ओशो शिष्य हे कोरेगाव पार्क येथील आश्रम परिसरात दाखल झाले आहेत. यावेळी आश्रम प्रशासनकडून जो ओशो भक्त माळ घालून येईल त्याला प्रवेश बंदी होती. दरम्यान, काल ते स्थगित करून भक्तांना आत माळ घालून सोडण्यात आले होते. पण आज सकाळी पुन्हा एकदा ओशो प्रशासक हे आक्रमक होत भक्तांना माळ घालून जण्यास विरोध करण्यात आला. यामुळे ओशो भक्त आक्रमक झाले. यावरून पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आल्याचा आरोप ओशो भक्तांनी केला आहे.

आश्रमात जाण्यास नकार : आचार्य रजनीश ओशो यांच्या 70 व्या संबोधी दिवसानिमित्त आश्रमातील ओशोंच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी देशभरातून मोठ्या संख्येने भाविक हे पुण्यात आले होते. गेल्या काही दिवसांपासून ओशो भक्त आणि ओशो प्रशासन यांच्यात मोठ्या प्रमाणात वादविवाद सुरू असून भक्तांना माळा घालून आतमध्ये आश्रमात प्रवेश दिला जात नाही. पण काल मोठ्या प्रमाणावर भक्त पुण्यात आल्याने त्यांना माळा घातली असताना देखील सोडण्यात आले होते. पण आज या भक्तांना माळ घालून आतमध्ये प्रवेश देण्यात आल नाही. आणि पोलिसांना बोलवून या भक्तांना बाहेर काढण्यात आले आहे. तसेच यावेळी या आक्रमक भक्तांकडून आश्रमाच्या बाहेर गाणी, भजन, कीर्तन करून आंदोलन करण्यात आले आहे.

लाठीचार्ज केलेला नाही : पुण्यातील कोरेगाव पार्क येथे असणाऱ्या ओशो आश्रम मध्ये भक्त दर्शनासाठी गर्दी करत आहेत. यावर झोन 2 च्या पोलिस उपायुक्त स्मार्थना पाटील यांनी माध्यमांसोबत संवाद साधला. त्या म्हणाल्या की, ओशो भक्तांचा वाद बऱ्याच दिवसांपासून सुरू आहे. यामध्ये त्यांचे दोन गट पडले असुन हा त्यांचा अंतर्गत वाद आहे. आम्हीमध्ये पडणार नव्हतो पण त्यांचा वाद आज पुन्हा विकोपाला गेला आहे. हे प्रकरण सध्या न्यायालयात आहे. एक तरुण पोलिसांच्या आंगावर धावून आला आणि हल्ला करण्याचा त्याचा प्रयत्न करत होता. त्यामूळे त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. आम्ही कुठलाही लाठीचार्ज केलेला नाही, अशी माहिती झोन दोन च्या पोलिस उपायुक्त स्मार्थना पाटील यांनी दिली आहे.

पोलिस उपायुक्त स्मार्थना पाटील माहिती देताना

हेही वाचा : Rajnish Osho Sambodhi Day : आचार्य रजनीश ओशो यांचा ७० वा संबोधी दिवस; पाहा ओशो आश्रमामधील व्हिडिओ

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.