पुणे- जिल्ह्यात खोडद येथील रेडिओ दुर्बिण प्रकल्प असलेल्या जीएमआरटीत दोन दिवसीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. 'राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या' निमित्ताने या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असून यात अनेक नामवंत संस्था, शाळा व अभियांत्रिकी विद्यालये सहभागी झाली आहेत.
हेही वाचा- इंग्रजीची भीती विसरून कैदी गिरवताहेत धडे; हर्सूल कारागृहातील चित्र
आज (शनिवारी) सकाळी हैदराबाद येथील नॅशनल रिमोट सेन्सिंग सेंटर (इस्रो), या संस्थेचे वैज्ञानिक शंतनू चौधरी यांच्या हस्ते या विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. कार्यक्रमाचा समारोप उद्या (रविवारी) सांयकाळी 4 वाजता होणार आहे.
तांत्रिक क्षमतेत जीएमआरटीने 10 पटीने उच्च क्षमता वाढवल्यानंतर प्रथमच हे भव्य प्रदर्शन इथे होत आहे. आज दिवभर सुमारे 10 हजार विज्ञान प्रेमी इथे भेट देणार आहेत. या प्रदर्शनाची प्राथमिक, माध्यमिक, उच्चमाध्यमिक आणि अभियांत्रिकी अशा चार गटांमध्ये विभागणी केली आहे. दरम्यान, विज्ञान दिनानिमित्त विज्ञान प्रदर्शात रेडिओ अॅस्ट्रॉनॉमीच्या इतिहासाची माहिती दिली जात आहे. विशेष म्हणजे या प्रदर्शनामध्ये खगोल शास्त्रज्ञांची थेट संपर्क साधून प्रश्न विचारता येत आहेत.