पुणे - हे सरकार रोज घोषणा करते आणि मागे जाते. म्हणून हे सरकार पलटुराम सरकार आहे. रोज आश्वासन देतात, मात्र त्या आश्वासनावर टिकून राहत नाहीत. गेल्या वर्षभरात महाराष्ट्रातील चालू कामाला स्थगिती या सरकारने दिली. महाराष्ट्र स्थगित केला, बंद पाडला, यापेक्षा कुठलेही कर्तृत्व या सरकारचे नाही, अशी घणाघाती टीका माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. तसेच एक नवे काम महाराष्ट्राच्या हिताच केले नाही. केवळ बदल्या करा आणि माल कमवा हे सुरू आहे. या सर्वांमुळे महाराष्ट्रातील जनतेमध्ये असंतोष निर्माण झाला आहे, असे देखील त्यांनी म्हटले आहे.
ते पुणे पदवीधर मतदारसंघाचे भाजपचे अधिकृत उमेदवार संग्राम देशमुख व पुणे शिक्षक मतदारसंघाचे भाजपचे अधिकृत उमेदवार जितेंद्र पवार यांच्या प्रचारार्थ मेळाव्यात बोलत होते. यावेळी भाजप शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे, महापौर उषा उर्फ माई ढोरे, आमदार लक्ष्मण जगताप आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
फडणवीस म्हणाले की, देशातील संपूर्ण वातावरण बदलले आहे. कोविडचे आव्हान आपण सर्वांनी पाहिले आहे. या कोरोनाच्या काळामध्ये राजकीय पक्ष, वेगवेगळ्या संघटना, मुख्यमंत्री, मंत्री हे पंतप्रधान मोदी यांना नावे ठेवायचे आणि टीका करायचे. तेव्हा, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सातत्याने सामान्य नागरिकांची चिंता करत होते. उद्योगांना त्यांनी भांडवल दिले. नऊ महिने कर्जाचा हप्ता भरावा लागणार नाही, ही व्यवस्था उभी करून दिली. कोविड काळातील कर्जावरील व्याज रद्द करण्याचे काम पंतप्रधान यांनी केले आहे. समाजातील विविध घटकांना या आव्हानात जगता आल पाहिजे, यासाठी आत्मनिर्भर भारत पॅकेजद्वारे प्रत्येकाच्या खात्यात पैसे दिले.
देशातील नागरिकांना कर्मयोगी आवडतात; बोलघेवडे नाही
या देशातील नागरिकांना कर्मयोगी आवडतात. मोदी हे कर्मयोगी आहेत ते कर्म करतात. या देशातील नागरिकांना बोलघेवडे लोक आवडत नाहीत. जे केवळ बोलतात काहीच करत नाहीत. करोनाच्या काळात महाराष्ट्र सरकारने एक नव्या पैशांची मदत कोणाला केली नाही. समाजातील कुठल्याही घटकाला एका फुटक्या कवडीची मदत यांनी केली नाही.
महाराष्ट्रात एका फुटक्या कवडीची मदत केली नाही
कोविडमध्ये देशातील छोट्या-छोट्या राज्यांनी आर्थिक पॅकेज तयार केले. गरीब आणि मध्यमवर्गीयांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न केला. पण, देशातील सर्वात समृद्ध राज्य म्हणून महाराष्ट्रला ओळखले जाते. तिथे मात्र, एका फुटक्या कवडीची मदत केली नाही. केवळ तुम्ही तुमच्या घरी राहा आणि कुटुंब सांभाळा, आम्ही आमच्या घरी राहतो आणि आमचे कुटुंब संभाळतो. याच्या व्यतिरिक्त कुठलेही काम महाराष्ट्रात झाले नाही.
दोन खोल्यांना तीस हजार वीज बिल
पुढे ते म्हणाले की, कोविड महामारीत नागरिकांना भरमसाठ नागरिकांना वीजबिल आली. आम्ही पहिल्यांदा आंदोलन केले. संपूर्ण महाराष्ट्रातील बिल जमा केली. दोन खोल्यात राहणाऱ्यांना तीस हजारांचे बिल आले. सरकारला ती बिले दाखवली. उभ्या महाराष्ट्रात न वापरलेल्या विजेची बिल तुम्ही नागरिकांना देता, त्यावर मंत्री बोलले आम्ही बिल सुधारून देऊ आणि बिलात सवलत देखील देऊ.
या सरकारने विजेचा शॉक दिला, त्यांना मतांचा शॉक द्या
त्यानंतर काही कालावधी निघून गेला. वीज बिल सवलत मिळणार असल्याचं पत्रकार परिषद घेऊन सांगण्यात आलं. मग, सात दिवसानंतर राज्याचे ऊर्जा मंत्री म्हणाले वीज वापरली तर पैसे भरावे लागतील. कोणाला एक पैश्यांची सवलत मिळणार नाही अस सांगतात. त्यानंतर ऊर्जा मंत्री म्हणतात, ज्यावेळी घोषणा केली तेव्हा माझा अभ्यास च झाला नव्हता. हे कुठला अभ्यास करतात हे मला देखील समजत नाही. आता म्हणतात कुठल्याही प्रकार ची सूट देता येणार नाही. ज्या सरकार ने विजेचा शॉक दिला त्या सरकार ला मतांचा शॉक देऊन त्यांना जाग करण्याची संधी आपल्याला या निवडणुकीच्या माध्यमातून मिळाली आहे अस देवेंडे फडणवीस यांनी म्हटलं आहे.
शिवसेनेने अनैसर्गिक सरकार स्थापन केले - हर्षवर्धन पाटील
2019 मध्ये झालेल्या निवडणुकीत महाराष्ट्रातील जनतेने भाजपला पक्षाला संधी दिली. त्यांनी युतीवर विश्वास व्यक्त केला. पण काही लोकांनी फसवले, अनैसर्गिकरित्या सरकार स्थापन केले. हे सरकार योग्य आहे की अयोग्य, हे सरकार नित्तेमत्तेला धरून वागत आहे का की गैरमार्गाने वागतेय. याला जर उत्तर द्यायचे असेल तर एक तारखेला होणारे मतदान त्या दिशेने केले पाहिजे. देशमुख यांना निवडून दिले पाहिजे. बिहारमध्ये ज्या निवडणूक झाल्या त्या संदर्भात एक्सिट पोल वेगळेच काही सांगत होते. खऱ्या अर्थाने जनतेमध्ये जाऊन फडणवीस यांनी जे काम केले. केवळ त्यांच्या प्रयत्नामुळे बिहारमध्ये सत्ता आली असे हर्षवर्धन पाटील म्हणाले.
महाराष्ट्रातील पलटुराम सरकार; रोज घोषणा करतात आणि मागे जातात - देवेंद्र फडणवीस
गेल्या वर्षभरात महाराष्ट्रातील चालू कामाला स्थगिती या सरकारने दिली. महाराष्ट्र स्थगित केला, बंद पाडला, यापेक्षा कुठलेही कर्तृत्व या सरकारचे नाही, अशी घणाघाती टीका माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. ते पुणे पदवीधर मतदारसंघाचे भाजपचे अधिकृत उमेदवार संग्राम देशमुख व पुणे शिक्षक मतदारसंघाचे भाजपचे अधिकृत उमेदवार जितेंद्र पवार यांच्या प्रचारार्थ मेळाव्यात बोलत होते.