पुणे: शहरातील 26 राजकीय पक्षांच्या नेत्यांनी यांनी आज (शनिवारी) पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिलेली आहे. या पत्रकार परिषदेला मोहन जोशी, प्रशांत जगताप, गजानन थरकुडे, अजित अभ्यंकर, कष्टकरी कामगार सगळ्या पुरोगामी संघटना त्याचबरोबर अंधश्रद्धा निर्मूलन समितीसुद्धा या आंदोलनात सहभागी होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकमान्य पुरस्कार यावर्षी जाहीर झाला असून ते स्वीकारण्यासाठी येत आहेत. व्यासपीठावर विरोधी पक्षाचा ऐक्य घडवून आणणारे शरद पवार सुद्धा उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे शरद पवारच मंचावर असताना विरोधी पक्षाने अशा प्रकारे आंदोलन करणे योग्य आहे का, असा प्रश्न विचारला जात आहे. यावर आता शरद पवार सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांची भेट घेणार आहेत.
काय म्हणाले प्रशांत जगताप? दोन महिन्यांपूर्वी शरद पवार यांनीच फोन करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विनंती केली होती की, हा पुरस्कार स्वीकारावा. यावर प्रतिक्रिया देताना शहराध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले की, शरद पवार यांनी हा पुरस्कार दिला नसून टिळक स्मारकातर्फे तो दिला जात आहे. फक्त देशाच्या सर्वोच्च नेत्याला भेटण्यासाठी शरद पवार यांच्या माध्यमातून जावे लागेल. कुठल्याही सामाजिक कार्यक्रमाला वेळ दिल्यावर त्यासाठी जायचेच, हा शरद पवारांचा आजपर्यंतचा इतिहास आहे; परंतु सोमवारी शरद पवार हे पुण्यात येत असून त्यावेळेस या सर्व विरोधी पक्षाच्या नेत्यांची भेट होणार आहे. त्यामध्ये शरद पवार यांनी पुरस्कार वितरण कार्यक्रमाला जावे की जाऊ नये, याचा विचार होईल. त्यामुळे ही संभ्रमावस्था आता काही पसरवली जाऊ नये. त्याचा निर्णय आपल्या सर्वांना कळविण्यात येईल अशी माहिती प्रशांत जगताप यांनी दिलेली आहे.
पवारांच्या भेटीसह निदर्शनेही होणार? शरद पवार जरी व्यासपीठावर असले तरी विरोध प्रदर्शनात संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सहभागी होईल. काँग्रेस देखील सहभागी होणार आहे. काँग्रेसने एकत्र केलेले 26 राजकीय पक्ष देखील यात सहभागी होणार आहेत. त्यामुळे शरद पवार यांनी आमचे दिल्लीत सुद्धा नेतृत्व केलेले आहे. ते विरोधी पक्षाचा एक मोठा विरोधी चेहरा आहेत. त्यामुळे त्यांची भेट घेऊन चर्चा करू; परंतु निदर्शने मात्र होणार असल्याची माहिती मोहन जोशी यांनी दिलेली आहे.
हेही वाचा: