पुणे - कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा घेता येणार नाहीत, असा निर्णय महाराष्ट्राच्या उच्च तंत्र शिक्षण मंत्रालयाने जाहीर केला आहे. परंतु, मुक्त विद्यापीठातील अंतिम वर्षाच्या परीक्षा होणार आहेत की नाही? यावर मात्र सरकार काही बोलायला तयार नाही. आमच्या परीक्षा होणार आहेत की नाही? इतकं तरी सांगा असा सवाल या विद्यार्थ्यांकडून केला जातोय.
राज्यात मुक्त विद्यापीठमध्ये शिक्षण घेणारे अनेक विद्यार्थी आहेत. आपली नोकरी व्यवसाय सांभाळून हे विद्यार्थी शिक्षण घेत असतात. येन परीक्षेच्या तोंडावर कोरोनाचे संकट उद्धभवले आहे. अनेक शाळा, महाविद्यालयातील परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. जून महिन्यात सुरू होणारी शाळा, महाविद्यालयं अजूनही उघडली नाहीत. या सर्व पार्श्वभूमीवर राज्य शासनाकडून जीआर काढून या शाळा महाविद्यालयांना वेळोवेळी सूचना केल्या जात आहेत. परंतु, या जीआरमध्ये मुक्त विद्यापीठासाठी कोणतेही निर्देश नाहीत असे मुक्त विद्यापीठात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. शासनाने या विद्यार्थ्यांचा विचार करून परिक्षा होणार आहेत की नाही यासंबंधी माहिती द्यावी अशी मागणी विद्यार्थ्यांनी केलीय.
मुक्त विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा होणार का? विद्यार्थ्यांचा सरकारला सवाल - मुक्त विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांचा सवाल
कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा घेता येणार नाहीत, असा निर्णय महाराष्ट्राच्या उच्च तंत्र शिक्षण मंत्रालयाने जाहीर केला आहे. परंतु, मुक्त विद्यापीठातील अंतिम वर्षाच्या परीक्षा होणार आहेत की नाही? यावर मात्र सरकार काही बोलायला तयार नाही.