मुंबई : केंद्रीय ऑनलाईन प्रवेशाकरिता ( Central online Admission ) सन २०२२-२३ या वर्षासाठी आतापर्यंत तीन नियमित, तीन विशेष फेरीचे आयोजन करण्यात आलेले होते. विद्यार्थ्यांचे द्वितीय सत्र सुरु झालेले आहे. तरीही काही विद्यार्थी प्रवेशासाठी क्षेत्रीय कार्यालये व संचालनालय कार्यलय येथे येऊन प्रवेशासाठी विनंती करत आहेत. हजारो विद्यार्थ्यांना अकरावीसाठी ऑनलाइन प्रवेश हवा आहे. त्यामुळे त्यांनी विभागीय कार्यालयाद्वारे ही मुदत वाढवण्यात आलेली आहे.
हजारो विद्यार्थी प्रवेशासाठी इच्छुक - जून 2022 पासून अकरावीसाठी ऑनलाइन प्रवेशाची सुरुवात झाली. तीन विशेष फेऱ्या तीन नियमित फेऱ्या आयोजन झाले. मात्र प्रत्येक फेरीमध्ये हजारो मुले प्रवेशापासून वंचित राहत होती. याबाबत राज्य शिक्षण संचालक यांच म्हणणं असं होतं की,' हजारो विद्यार्थी वेगवेगळ्या कोर्सेसला प्रवेश घेतात तर त्यांना इतर विषयाच्या कोर्सेससाठी प्रवेश हवा असतो. त्यामुळे ते या प्रवेश प्रक्रियेच्या शिवाय दुसरीकडे प्रवेश घेतात. शासनाच्या या दाव्यानंतरही तरीही हजारो विद्यार्थी ऑनलाइन प्रवेश घेण्यासाठी इच्छुक आहेत.
अतिरिक्त संधी मिळावी म्हणून निर्णय - याबाबत शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक महाराष्ट्र शासन कृष्णकुमार पाटील यांनी सांगितले,"अनेक विद्यार्थी अन्य ठिकाणी प्रवेश रद्द केले म्हणून तसेच स्थलांतर झाले व इतर वैयक्तिक कारणामुळे त्यांचे ऑनलाइन प्रवेश राहिले असे निदर्शनास येत आहेत. अशा विद्यार्थ्यांना प्रवेशाची अखेरची संधी मिळावी. या उद्देशाने इ. ११ वी राज्यस्तर प्रवेश नियंत्रण समितीच्यावतीने चर्चा करण्यात आली. आणि अशा विद्यार्थ्यांना प्रवेशाची एक अतिरिक्त संधी देणेबाबत सदस्यांचे एकमत झाले. त्यानुसार पुढीलप्रमाणे सन २०२२-२३ मधील अंतिम प्रवेश आयोजन करण्यात येत आहे."
अशी असेल प्रवेशप्रक्रिया - २०२२-२३ इ.११वी मध्ये प्रवेशासाठी ही अखेरची संधी असेल. त्या अंतर्गत कार्यवाहीचे टप्पे पुढीलप्रमाणे असतील. १५ व १६नोव्हेंबर २०२२ रोजी दैनंदिन गुणवत्ता फेरी अर्थात DMR विशेष फेन्यांचे आयोजन करण्यात येईल. यानंतर ते बंद होतील. १७ व १८ नोव्हेंबर २०२२ रोजी शिक्षण उपसंचालक स्तरावरून अलॉटमेंट करण्यात येईल व अलॉटमेंट मिळालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी एक दिवस मिळेल. यानंतर १९ नोव्हेंबर २०२२ पर्यंत प्रवेश घेता येतील. प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश रद्द करण्यासाठी १४ नोव्हेंबर व १५ नोव्हेंबर २०२२ होणार मुदत असणार आहे. तसेच नवीन विद्यार्थ्यांसाठी १५ नोव्हेंबर २०२२ पर्यन्त मुदत असणार आहे. तर शिक्षण संस्थांना 19 नोव्हेंबर पर्यन्त मुदत आहेत. या मुदतीत शिक्षण संस्थांनी प्रक्रिया पूर्ण करावयाच्या आहेत.