ETV Bharat / state

Online Betting on World Cup 2023 : इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका क्रिकेट सामन्यावर सट्टा घेणारा बुकी विरोधी पथकाच्या ताब्यात; 40 लाखांचा मुद्देमाल जप्त - इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामना

Online Betting on World Cup Matches : इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका क्रिकेट सामन्यावर सट्टा घेणाऱ्या एका बुकीला काळेवाडी येथून गुंडा विरोधी पथकानं अटक केली आहे. तसंच त्याच्याकडून तब्बल 40 लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आलीय.

Online Betting on World Cup Matches
सट्टा घेणारा बुकी गुंडा विरोधी पथकाच्या ताब्यात; 40 लाखांचा मुद्देमाल जप्त
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 23, 2023, 7:53 AM IST

पिंपरी चिंचवड (पुणे) Online Betting on World Cup Matches : सध्या वर्ल्ड कपचा फिव्हर सर्वत्र दिसून येत आहे. मात्र, याच दरम्यान सट्टेबाजीच्या घटनादेखील उघडकीस येत आहेत. पिंपरी चिंचवड शहरात देखील अशीच एक घटना उघडकीस आली आहे. पिंपरी चिंचवड शहर पोलिसांतील गुंडा विरोधी पथकानं इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका क्रिकेट सामन्यावर सट्टा घेणाऱ्या बुकीला अटक केलीय. आरोपी सट्टेबाजाकडून पोलिसांनी तब्बल 40 लाख रुपयांची रोकड जप्त केली, ही कारवाई शनिवारी (दि. 21) काळेवाडी येथे करण्यात आली आहे. दरम्यान, दिनेश हरीश शर्मा (वय 38, रा. काळेवाडी) असं अटक करण्यात आलेल्या आरोपी बुकीचं नाव आहे.

सोशल मीडिया अ‍ॅपद्वारे केली बेटिंग : पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी चिंचवड शहरातील काळेवाडी परिसरात गस्त घालत असताना गुंडा विरोधी पथकाचे प्रमुख सहायक पोलीस निरीक्षक हरीश माने यांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की, फ्लॅट नंबर 701, आदी आम्मा सोसायटी , निरंकारी भवन जवळ, काळेवाडी येथे एकजण क्रिकेट लाईव्ह लाईन गुरु या सोशल मीडिया अ‍ॅपद्वारे बेटिंग घेत आहे. जेव्हा इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात सामना झाला. त्यावेळी या सामन्यावर सट्टा घेतला जात असतांना गुंडा विरोधी पथकानं फ्लॅटमध्ये छापा टाकला.

...अन् आरोपीला रंगेहाथ पकडलं : एका अ‍ॅपच्या माध्यमातून सामना सुरु होण्यापूर्वी इंग्लंड जिंकले तर 1 रुपयाला 60 पैसे, आणि दक्षिण आफ्रिका जिंकली तर 1 रुपयाला 61 पैसे असा भाव सुरुवातीला ठरलेला होता. जसं जशी मॅच पुढं जाईल तसा हा भाव वर-खाली होत राहतो. त्याप्रमाणे त्या-त्या वेळेस अ‍ॅपद्वारे दर ठरवला जातो व सट्टा घेतला जातो. वर्ल्ड कप 2023 च्या इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका या देशात सुरू असलेल्या सामन्यावर हाई-लागाई नावाचा क्रिकेट सट्टा हा धनू व शिवन यांच्याकडे खेळत असताना आरोपीला रंगेहाथ पकडण्यात आलं. तसंच यावेळी त्याच्याकडून 40 लाख रुपये रोख, 2 मोबाईल, कॅल्युलेटर असा एकूण 40 लाख 80 हजार 100 रुपयांचा मुद्देमाल गुंडा विरोधी पथकानं जप्त केला.

कोणी केली कारवाई : दरम्यान, ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरे, सहायक पोलीस आयुक्त सतीश माने यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडा विरोधी पथकाचे प्रमुख सहायक पोलीस निरीक्षक हरीश माने, पोलीस अंमलदार हजरत पठाण, गणेश मेदगे, नितीन गेंगजे, शाम बाबा, रामदास मोहिते, तौसीफ शेख व तांत्रिक विश्लेषण विभागाचे पोलीस अंमलदार पोपट हुलगे यांनी केली.

हेही वाचा -

  1. Betting In IPL Matches: 'आयपीएल'वर इतक्या कोटींचा लागलाय सट्टा! मॉडर्न टेक्नॉलॉजीमुळे सटोरींची पोलिसांच्या हातावर तुरी
  2. Betting On IPL Cricket Matches: आयपीएल क्रिकेट मॅचवर सट्टा खेळणाऱ्या दोघांना दीड लाखांच्या मुद्देमालासह अटक
  3. Betting On IPL Cricket Match : क्रिकेट सट्टेबाजीप्रकरणी तिघांना अटक, पाच जणांवर गुन्हा दाखल

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.