पुणे - देशभरात नागरिकत्व सुधारणा कायदा आणि नागरिकत्व संशोधन विधेयकाचा देशभरात विरोध केला जात आहे. आज(रविवार) सकाळी साडेदहा वाजता पुण्यातही मुस्लीम समाजाकडून पुण्यातील विधानभवनवर भव्य मोर्चा काढण्यात आला. हजारोंच्या संख्येने मुस्लीम बांधव या मोर्चात सहभागी झाले होते. पुण्यातील गोळीबार मैदान येथून या मोर्चाला सुरुवात झाली.
हेही वाचा - कोरेगाव-भीमा शौर्य दिनासाठी प्रशासनाची जय्यत तयारी
नागरिकत्व कायद्याविरोधात पुण्यात रविवारी आणखी एका मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. संविधानाच्या विरोधात जाण्यारांच्या विरोधात लढू, मुसलमान कुठल्याही कायद्याला घबरात नाही. मुसलमान कागदी भारतीय नाही तर, खरे हिंदुस्थानी आहेत अशा भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या. तसेच, हिंदुस्थान जिंदाबादच्या घोषणा यावेळी देण्यात आल्या. गोळीबार मैदानापासून सुरू झालेला हा मोर्चा सेव्हन लव्हज चौक मार्गे रवाना झाला. मोर्चादरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, याकरता पोलिसांनीही चोख बंदोबस्त तैनात केला होता.
हेही वाचा - कोरेगाव-भीमा शौर्यदिवस; प्रशासन सज्ज