पुणे- डॉ. बाबसाहेब आंबेडकर यांनी 25 डिसेंबर 1954 साली देहूरोड येथे स्वहस्ते बुद्ध मूर्तीची प्रतिस्थापना केली होती. या घटनेला उद्या 65 वर्ष पूर्ण होत आहे. या पार्श्वभूमीवर उद्या पिंपरी-चिंचवड शहरावजवळ असलेल्या धम्मभूमीवर एक लाख भीम अनुयायी महाबुद्ध वंदना म्हणणार आहेत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी येवले येथे मुक्कामी असताना १९३५ साली भीम गर्जना केली होती की, मी जरी हिंदू धर्मात जन्मलो असलो तरी हिंदू धर्मात मरणार नाही. त्याच पार्श्वभूमीवर देहूरोड येथे आंबेडकरांनी २५ डिसेंबर १९५४ साली स्वहस्ते बुद्ध मूर्तीची प्रतिस्थापना केली होती. तो दिवस म्हणजे उद्याचा दिवस. उद्या २५ डिसेंबरला या ऐतिहासिक घटनेला ६५ वर्ष पूर्ण होणार आहेत. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहराजवळ असलेल्या धम्मभूमीवर एक लाख लोकांच्या साक्षीने आणि शंभर भंते यांच्या हस्ते धम्म वंदनेचे आयोजन करण्यात आले आहे.
दरम्यान, नागपूर येथे १४ ऑक्टोबर १९५६ साली बाबासाहेबांनी बौद्ध धर्माची दीक्षा दिली होती. मात्र, त्या अगोदर १९५४ ला देहूरोड येथे बुद्धमूर्ती प्रतिस्थापना केल्यामुळे या भूमीला वेगळे महत्त्व आहे. या पार्श्वभूमीवर देहूरोड येथे विशेष पोलीस बंदोबस्त असणार आहे. 1 डीसीपी, 4 एसीपी, 10 वरिष्ठ पोलीस निरीक्षक, 25 पोलीस अधिकारी तर २०० पेक्षा अधिक पोलीस कर्मचारी, होमगार्ड असा पोलिसांचा फौजफाटा असणार आहे.
हेही वाचा- कोरेगाव भीमा : शौर्यदिनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचे 'मॉक ड्रिल'