पुणे - पुण्यातील कात्रज जवळ असलेल्या बोगद्याजवळ बुधवार (दि. 26 जानेवारी)रोजी रात्री 9 वाजेच्या सुमारास अपघात झाला आहे. या अपघातात एकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर एकजण गंभीर जखमी झाला आहे.
कात्रज येथील नवीन बोगद्याजवळ जांभूळवाडीच्या दरीपूलजवळ अपघात झाला असून या अपघातात कंटेनर आणि चारचाकी गाडी एकमेकाला धडकले आहे. (Terrible accident near Katraj in Pune) या अपघातात दुचाकीवरून जाणाऱ्या एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला आहे. तर, एकजण गंभीर जखमी असल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान. कंटेनर चालक फरार झाला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पुढील तपास भारती विद्यापीठ पोलीस करीत आहेत.
हेही वाचा - Mumbai Building Collapsed : मुंबईत चार मजली इमारत कोसळली.. ९ जणांना ढिगाऱ्याखालून काढले