ETV Bharat / state

हस्तिदंत तस्करी करणाऱ्याला स्वारगेटहून अटक - हस्तिदंत तस्करी स्वारगेट

स्वारगेट परिसरात पोलिसांनी सापळा रचून अमूल्य हस्तिदंत हस्तगत केले आहेत. तस्करी करणाऱ्या एकाला अटक केली असून हे हस्तीदंत कुठून आले याचा पोलीस तपास करत आहेत.

हस्तिदंत
author img

By

Published : Oct 3, 2019, 11:47 PM IST

पुणे - पोलिसांनी हस्तिदंताची तस्करी करणाऱ्या एकाला अटक केली आहे. आरोपीच्या ताब्यातून सात मोठे हस्तिदंत आणि तीन इतर प्राण्यांचे दंत जप्त केले. भीमा चव्हाण (मूळ तेलंगणा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

हस्तिदंत तस्करी करणाऱ्याला स्वारगेटहून अटक

हेही वाचा - डोंबिवलीत मोबाईल दुकान फोडून चोरट्यांनी पळवले १७ लाखांचे मोबाईल

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेचे पोलीस कर्मचारी यशवंत खंदारे आणि मोहसीन शेख यांना स्वारगेट परिसरात एक जण हस्तिदंत विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांच्या एका पथकाने सापळा रचून एकाला ताब्यात घेतले. त्याच्याजवळ असलेल्या एका बॅगेतून चार मोठ्या आकाराचे कोरीव नक्षीकाम केलेले हस्तिदंत आढळले.

यातील एक हस्तिदंत ३ फूट लांब आणि दुसरा ३.७५ फूट लांबीचा आहे. यातील एकावर इंग्रजीमध्ये 'मोनिका' तर दुसऱ्यावर विविध वन्यप्राण्यांची कलाकृती कोरली आहे. या सर्व हस्तिदंताची किंमत अमूल्य आहे. आरोपीला पोलीस कोठडी सुनावली असून त्याने हे हस्तिदंत कुठून आणले याचा तपास सुरू आहे.

हेही वाचा - वाशीत तरुणावर ५ जणांचा अनैसर्गिक अत्याचार, प्रकृती चिंताजनक

Intro:पुणे पोलिसांनी हस्तिदंताची तस्करी करणाऱ्या एकाला अटक केलीय..त्याच्या ताब्यातून 7 मोठे हस्तिदंत आणि 3 इतर प्राण्यांचे दंत जप्त केले..
भीमा चव्हाण (मूळ तेलंगणा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे..Body:पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेचे पोलीस कर्मचारी यशवंत खंदारे आणि मोहसीन शेख यांना स्वारगेट परिसरात एक जण हस्तिदंत विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती..त्यानुसार पोलिसांच्या एका पथकाने सापळा रचून एकाला ताब्यात घेतले..त्याच्याजवळ असलेल्या एका बॅगेतून 4 मोठ्या आकाराचे कोरीव नक्षीकाम केलेले हस्तिदंत आढळले..
Conclusion:
यातील एक हस्तिदंत 3 फूट लांब आणि दुसरा 3.75 फूट लांबीचा आहे..यातील एकावर इंग्रजीमध्ये 'मोनिका' तर दुसऱ्यावर विबिध वन्यप्राण्यांची कलाकृती कोरली आहे..या सर्व हस्तिदंताची किंमत अमूल्य आहे..आरोपीला पोलीस कोठडी सुनावली असून त्याने हे हस्तिदंत कुठून आणले याचा तपास सुरू आहे...
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.