पुणे - विषारी द्रव्य प्राशन केल्याने बारामती तालुक्यातील शिरष्णे येथील एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. टाळेबंदीच्या काळात मद्यपींना दारू मिळत नव्हती. त्यामुळे अनेकांनी सॅनीटायझर, स्पिरिटसारखे विषारी द्रव्याचे दारू म्हणून सेवन केले जात असल्याच्या घटना अनेक ठिकाणी घडल्या होत्या. दत्तात्रय वाघमारे (वय४२) असे मृताचे नाव आहे.
वाघमारे व त्यांच्या इतर मित्रांनी चार दिवसांपूर्वी दारू निर्मितीसाठी वापरण्यात येणाऱ्या स्पिरिट सारख्या विषारी द्रव्याचे प्राशन केले होते. त्यात वाघमारे यांचा मृत्यू झाला. तर इतर लोकांवर बारामती व फलटण येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
काही दिवसांपूर्वीच फलटण तालुक्यातील जिंती येथे दारू न मिळाल्याने तिघांनी सॅनीटायझर प्राशन केल्याने तिघांचाही मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच शिरष्णे येथे हा प्रकार घडला आहे. दरम्यान याबाबत पोलीस प्रशासन अनभिज्ञ आहे. मृत वाघमारे यांची बारामती शहर पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद झाली आहे.
दारू समजून विषारी द्रव्य प्राशन केल्याने बारामतीत एकाचा मृत्यू, आठ जणांवर उपचार सुरू