ETV Bharat / state

विनाकारण घराबाहेर फिरणाऱ्यांवर आळा घालण्यासाठी 'हौसिंग सोसायट्यांना नोटीस'

टाळेबंदीच्या काळात विणाकर फिरणाऱ्यांवर आळा घालण्यासाठी पुणे पोलिसांनी सोसायट्यांनाच नोटीस बजावली आहे.

हडपसर पोलीस ठाणे
हडपसर पोलीस ठाणे
author img

By

Published : Apr 4, 2020, 4:04 PM IST

पुणे - टाळेबंदीच्या काळात विणाकारण फिरणाऱ्यांवर आळा घालण्यासाठी पुणे पोलिसांनी आता थेट सोसायट्यांनाच नोटीस पाठवली आहे. यात एक दोन नव्हे तर 13 नियमावलींचा समावेश आहे. याचा भंग केल्यास संबंधितांवर कलम 188अंतर्गत गुन्हा दाखल करण्याचा इशारा देण्यात आला आहे. या माध्यमातून नागरिकांची सोसायटीच नाकाबंदी करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

काय आहेत नियम..?
1) सोसायटी सदस्यांनी अनावश्यक कारणासाठी बाहेर जाऊ नये.

2)आवश्यक काम नसेल तर सोसायटीतील सदस्य दुचाकी किंवा चारचाकी पोलिसांच्या परवानगीशिवाय सोसायटीच्या बाहेर घेऊन जाणार नाही.

3) सोसायटीच्या सदस्यांनी किराणा दूध आणि भाजी विक्रेत्यांना समन्वय साधून वेगवेगळ्या ठिकाणी सोसायटीत माल विकण्यासाठी मदत करावी, येथे सोशल डिस्टन्स ठेवावा.

4) सोसायटीमधून येणाऱ्या-जाणाऱ्या सदस्यांनी नोंदणी पुस्तिकेत कारण आणि वेळ लिहून ठेवा, त्याचबरोबर प्रवेशद्वार सॅनिटायझेशन करावे आणि हात धुण्यासाठी सॅनिटायझरची व्यवस्था करावी.

5) सदस्यांनी भाजी, किराणा यासाठी खासगी कोणत्याही वाहनाचा वापर करू नये.

6) सकाळी आणि संध्याकाळी पाळीव प्राण्यांना घराबाहेर घेऊन बाहेर पडू नये.

7) एखादा व्यक्ती बाहेरील राज्यातून देशातून आला असून तो जर ओळख लपवत असेल तर संबंधित पोलीस ठाण्याला त्वरित माहिती कळवावी.

8) होमक्वारंटाईन व्यक्ती त्याच्या निवासस्थानातून मुदतीच्या आत कुठे फिरत असेल तर त्याची माहिती द्यावी.

9) कोणत्याही सदस्याला कोरोना लक्षणे दिसून आल्यास त्वरित रुग्णवाहिकेशी संपर्क साधावा.

10) सोसायटीत आलेल्या आरोग्य विभागातील आणि पोलीस विभागातील कर्मचाऱ्यांना आवश्यक ते सहकार्य करावे.

11) आरोग्य विभाग आणि पोलीस यांच्या वेळोवेळी आलेल्या सूचनांचे पालन करावे.

12) कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता चुकीचे मेसेज सोसायटी ग्रुपवर पाठवले जाणार नाही, याची दक्षता घ्यावी.

13) या नोटिशीचा भंग केल्यास संबंधित व्यक्तीवर 188कलमांतर्गत गुन्हा दाखल केला जाईल.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.