(राजगुरुनगर) पुणे - संत ज्ञानेश्वर महाराजांचा आषाढी वारी सोहळा आजपासून सुरू होत असून चार वाजता संजीवन समाधी मंदिरातून पालखीचे प्रस्थान होणार आहे. मात्र, कोरोनाच्या संकटामुळे यावर्षी अलंकापुरीत टाळ-मृदुंगाचा गजर नाही, वारकऱ्यांच्या राहुट्या नाही, अभंगाची सुरावट नाही, असा हा सुना सोहळा देवाच्या अलंकापुरीमध्ये होत आहे.
या आळंदीनगरीमध्ये माऊली.. माऊली.. एकच शब्द संपूर्ण अलंकापुरी दणाणून सोडतो. मात्र, यावर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आषाढीवारी सोहळा रद्द करण्यात आल्याने आळंदीत येणारा वैष्णवांचा महासागर थांबला आहे.
इंद्रायणी घाटाच्या तीरावर दिवसभर फेर फुगड्या, नाम घोष करत वारकरी प्रस्थान पूर्वीचा आनंद मनसोक्त लुटत असतात. टाळ-मृदंगाचा निनाद व ज्ञानोबा माऊलींच्या घोषाने संपूर्ण अलंकापुरी दुमदुमून जाते. मात्र, यंदा असे चित्र पाहायला मिळत नाही.
हेही वाचा - आषाढी वारी..! संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्याला आजपासून सुरुवात