पुणे : पुण्यातील चांदणी चौकातील उड्डाणपुलाचे उद्घाटन झाले आहे. या उद्घाटन प्रसंगी महाराष्ट्र राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी उपस्थित होते. विशेष म्हणजे नाराज असलेल्या भाजपाच्या नेत्या मेधा कुलकर्णी यांनीही या कार्यक्रमाला हजेरी लावली. उद्धाटनाप्रसंगी बोलताना नितीन गडकरींनी मेधा कुलकर्णी यांचे कौतुक केले. त्यांच्या वारंवार मागणीमुळे हा प्रकल्प झाला. अडचणींवर मात करुन चांदणी चौकातील रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे. आधी हजारो कोटी खर्च करूनसुद्धा वाहतुकीची समस्या सोडवली गेली नव्हती, असे गडकरी यावेळी म्हणाले.
पुण्यात वाहतूक कोंडी : पुणे शहर झपाट्याने वाढत असल्याने लोकसंख्येबरोबरच शहरातील वाहनांची संख्या वाढू लागली आहे. वाहनांची संख्या वाढल्यामुळे शहरात वाहतूक कोंडी होत असते. यातून पुणेकरांची सुटका होण्यासाठी हवेतून चालणाऱ्या बस आणण्याचा विचार असल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी यावेळी सांगितले. पुण्यासाठी माझ्याकडे हवेतून चालणाऱ्या बसची कल्पना आहे. अजित पवार आणि चंद्रकांत पाटील यांनी एकदा त्याचे सादरीकरण पाहावे, अशी विनंतीही गडकरींनी यावेळी केली. हवेतून चालणारी बस ही वाहतूक कोंडीवर चांगला पर्याय आहे. विशेष म्हणजे या बसमधून एका वेळेस 250 प्रवाशी प्रवास करू शकतात. चांदणी चौकातील पूल उभारण्यासाठी परदेशी तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. मलेशिया, सिंगापूर येथील तंत्रज्ञानाचा वापर हा उड्डाणपूल तयार करण्यात आला आहे. पुण्यात भविष्यात 40 हजार कोटींचे कामे पूर्ण केली जाणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.
पुलाच्या कामामुळे वाढली होती वाहतूक कोंडी : पुण्यात कोथरूडमार्गे प्रवेश करणारे वाहनचालक जसे त्रस्त झाले होते. तसेच, महामार्गांवरून सातारा व सोलापूरकडे जाणारे वाहनचालकही कोंडी, अपघात व खराब रस्त्यामुळे गाड्या नादुरुस्त होत होत्या. त्यावर भाजप प्रदेशाध्यक्ष व कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी काही उपाय सुचवले होते.
हेही वाचा-