ETV Bharat / state

Hotel Vaishali Dispute : माझी मुलगी मला परत द्या हो! 4 वर्षांच्या मुलीला घेऊन पती दोन महिन्यांपासून बेपत्ता - पती मुलीसह बेपत्ता

पुण्यातील हॉटेल वैशालीच्या मालक असलेल्या निकिता शेट्टी यांनी त्यांच्या पतीविरोधात आरोप केले आहेत. त्यानुसार पती मागील दोन महिन्यांपासून त्यांच्या 4 वर्षीय मुलीसह बेपत्ता झालेला आहेत. आपल्या मुलीला शोधून द्यावे आणि पतीला अटक करावी, अशी मागणी निकिता यांनी केली आहे.

Hotel Vaishali Dispute
निकिता शेट्टी
author img

By

Published : Aug 16, 2023, 4:27 PM IST

मुलीच्या बेपत्ता होण्याबाबत निकिता शेट्टी यांची प्रतिक्रिया

पुणे : गेल्या काही महिन्यांपासून पुण्यातील सुप्रसिद्ध हॉटेल वैशालीचा सुरू असलेला वाद हा दिवसेंदिवस वाढतच आहे. आता हॉटेल वैशालीच्या मालक असलेल्या निकिता शेट्टी यांनी आपल्या पतीविरोधात आरोप केले आहेत. चार वर्षांच्या मुलीला घेऊन पती मागील दोन महिन्यापासून बेपत्ता आहे. या मुलीला शोधून मला द्यावे आणि पतीला अटक करण्यात यावी, अशी मागणी निकिता शेट्टी यांनी केली आहे.

काय म्हणाल्या निकिता शेट्टी - या प्रकरणात गुन्हा दाखल असूनही पोलीस कारवाई करण्यास टाळाटाळ करत आहेत, असे देखील त्यांनी सांगितले. दोन महिन्यांपासून मी माझ्या मुलीचा चेहरा पाहिला नाही. तिची आणि माझी भेट घडून आणावी अशी विनवणी यावेळी निकिता शेट्टी यांनी पुणे पोलिसांकडे केली आहे. पुण्यातील फर्ग्युसन रस्त्यावरील प्रसिद्ध हॉटेल वैशालीचा वाद अजूनही संपताना दिसत नाही. हॉटेल वैशालीची पाॉवर ऑफ अटर्नी बंदुकीचा धाक दाखवून आपल्या पतीनेच नावावर करून घेतल्याचा आरोप हॉटेलच्या मालकीण असलेल्या निकिता शेट्टी यांनी केला होता. त्यानंतर पुण्यातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी कौटुंबिक छळाचा गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.

यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल : विश्वजीत विनायकराव जाधव, अभिजीत विनायकराव जाधव, विनायकराव जाधव आणि वैशाली गायकवाड-जाधव यांच्या विरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या प्रकरणात आता नवीन ट्विस्ट निर्माण झाले आहे. आता हॉटेल वैशालीची मालक असलेल्या निकिता शेट्टी यांनी मला माझी मुलगी परत द्यावी, तसेच फरार असलेल्या पतीला शोधून पकडण्यात यावे अशी मागणी त्यांनी केली आहे.

काय म्हणाले डिसीपी - याबाबत डीसीपी संदीप गिल म्हणाले की, फिर्यादी यांनी तक्रार दाखल केल्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जे आरोपी आहे त्यांचा शोध सुरू आहे. मुलगी गुन्हा दाखल होण्याच्या आधीपासून आरोपी बरोबर राहत आहे. याचा शोध सुरू असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. पुण्यात यापूर्वीही लहान मुलींचे अपहरण झाले आहे. पण, आता निकिता शेट्टी प्रकरणी पोलीस काय भूमिका घेते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा:

  1. Mob Beaten To Boy: अल्पवयीन मुलीचे अपहरण करणाऱ्या मुलाला चोपले, वांद्र्यातील 'त्या' घटनेचा व्हिडिओ व्हायरल
  2. 307 चा बदला 302 ने; पूर्ववैमनस्यातून तरुणावर तलवारीने सपासप वार, स्वातंत्र्य दिनी गुंडांची दहशत
  3. Mathura House Wall Collapse: मंदिराजवळील इमारतीची भिंत कोसळल्याने 5 भाविकांचा मृत्यू, सीसीटीव्ही फुटेज व्हायरल

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.