पुणे - राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) रविवारी पुण्यातील एका शाळेच्या इमारतीचे दोन मजले जप्ते केले आहेत. या इमारतीमध्ये बंदी घातलेली पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) ही संघटना मुस्लिम तरुणांना कट्टरपंथीय बनवण्यासाठी आणि प्रबोधन करण्यासाठी शिबिरे आयोजित करत होती. त्यामुळे एनआयएने जप्तीची मोठी कारवाई केली आहे.
पुण्यात एनआयएची मोठी कारवाई - दहशतवादविरोधी एजन्सीने ब्लू बेल शाळेच्या इमारतीचा चौथा आणि पाचवा मजला जप्त केला आहे. या इमारतीचा वापर पीएपआयकडून भारताची एकता, अखंडता आणि सुरक्षितता धोक्यात आणण्याच्या उद्देशाने दहशतवादी कारवायांची योजना आखण्यासाठी आणि तयारी करण्यासाठी केला जात होता. यानंतर एनआयएने या शाळेच्या इमारतीच्या दोन मजल्यावर जप्तीची कारवाई केली आहे. याबाबतची माहिती एनआयएने दिली आहे.
काय आहे प्रकरण - NIA च्या म्हणण्यानुसार, PFI ही संघटना निष्पाप मुस्लिम तरुणांना एकत्रित करून त्यांचे माथे भडकवत होती. तसेच 2047 पर्यंत देशात इस्लामिक राजवट स्थापन करण्यास विरोध करणाऱ्यांना संपवण्यासाठी आणि त्यांच्यावर हल्ला करण्यासाठी त्यांना सशस्त्र प्रशिक्षण देखील पीएफआय संघटना देत होती. अशाचप्रकारचे काम पुण्यातील या शाळेच्या दोन मजल्यावर सुरु होता. त्यामुळे कारवाई करत दे दोन्ही मजले जप्त केले आहेत.
शाळांचे दोन मजले जप्त - गेल्या वर्षी 13 एप्रिल 2022 रोजी एनआयएने नोंदवलेल्या प्रकरणात बेकायदेशीर क्रियाकलाप (प्रतिबंध) कायदा, 1967 च्या तरतुदींनुसार ही कारवाई केली आहे. दहशतवादाची कार्यवाही करण्यासाठी त्या शाळेचे दोन मजल्यांचा वापर केला जात होता. आता ते दोन्ही मजले एनआएने जप्त केले आहेत. तसेच एनआयएने या वर्षी १८ मार्च रोजी दिल्लीतील विशेष न्यायालयासमोर पीएफआयच्या २० आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल केले होते.
पुण्यात एनआयची शोध मोहीम - एनआयएने गेल्या वर्षी 22 सप्टेंबर रोजी शाळेच्या आवारात केलेल्या शोध मोहिमेनंतर हे पाऊल उचलले आहे. तसेच संश्यास्पद कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. या मालमत्तेचा वापर दहशतवादी कारवायांसाठी आरोपींनी केला होता, असा खुलासा जप्त केलेल्या कागदपत्रातून झाला आहे. नव्याने भरती झालेल्या PFI कॅडरना भारतात इस्लामिक राजवट प्रस्थापित करण्याच्या संघटनेच्या विचारसरणीला, विरोध करणार्या प्रमुख नेत्यांवर हल्ला करण्यासाठी आणि त्यांची हत्या करण्यासाठी चाकू, विळा इत्यादी धोकादायक शस्त्रे वापरण्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे.