ETV Bharat / state

पुणे, पिंपरी चिंचवडच्या अनलॉकचा निर्णय सोमवारी? - पुणे अनलॉक सोमवारी निर्णय

राज्यात सध्या अनलॉक प्रक्रिया सुरू झाली आहे. पुणे शहराच्या अनलॉकबद्दलचा निर्णय सोमवारी होण्याची शक्यता आहे. पुणे जिल्ह्यात कोरोनाचे एकूण 10 लाख 23 हजार 771 पॉझिटिव्ह रुग्ण आजपर्यंत आढळले आहेत. सध्या 22 हजार 725 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

pune
पुणे
author img

By

Published : Jun 5, 2021, 7:04 PM IST

पुणे - राज्यात सध्या अनलॉक प्रक्रिया सुरू झाली आहे. राज्यातल्या ज्या जिल्ह्यात पॉझिटिव्हीटी रेट 5 टक्क्यांपेक्षा कमी आहे. जेथे 25 टक्के किंवा कमी ऑक्सिजन बेड भरलेले आहेत, अशा जिल्ह्यांना पूर्ण अनलॉक केले जाणार आहे. या जिल्ह्यांच्या यादीत सध्यातरी पुणे जिल्ह्याचे नाव नाही. त्यामुळे सोमवारी (7 जून) पुण्याच्या अनलॉकचा निर्णय होण्याची शक्यता आहे.

पुणे, पिंपरी चिंचवडच्या अनलॉकचा निर्णय सोमवारी?

शहरात पॉझिटिव्हीटी रेट कमी

राज्य सरकारने अनलॉक केल्या जाणाऱ्या जिल्ह्यांची नावे जाहीर केली आहेत. त्यात पुणे जिल्हाचा समावेश नाही. पुणे जिल्ह्यात कोरोनाचे एकूण 10 लाख 23 हजार 771 पॉझिटिव्ह रुग्ण आजपर्यंत आढळले आहेत. सध्या 22 हजार 725 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. सरकारने जाहीर केलेल्या स्तरांमध्ये पुणे जिल्हा पॉझिटिव्हीटी रेटमध्ये तिसऱ्या क्रमांकावर येतो. त्यामुळे पुणे जिल्ह्याची अद्यापही अनलॉकमधून सुटका झालेली नाही. मात्र, पुणे आणि पिंपरी चिंचवड शहराचा पॉझिटिव्हीटी रेट पुणे ग्रामीणपेक्षा कमी आहे.

पुणे ग्रामीणचा पॉझिटिव्हीटी रेट ज्यास्त

पुणे शहर आणि पिंपरी चिंचवड शहराचा पॉझिटिव्हीटी रेट 5 टक्क्यांच्या जवळ आहे. तर पुणे ग्रामीणमध्ये हाच रेट 10 टक्क्यांपेक्षा ज्यास्त आहे. त्यामुळे शहरात तरी अनलॉक करा, अशी मागणी होत आहे. याबाबत सोमवारी निर्णय होण्याची शक्यता आहे.

शहर अनलॉक करण्याची मागणी

सध्या पुणे महानगरपालिका क्षेत्रात शासकीय कार्यालये 25 टक्के उपस्थितीत सुरू ठेवायला परवानगी आहे. सोमवार ते शुक्रवार दरम्यान सकाळी 7 ते दुपारी 2 वाजेपर्यंत सर्व दुकाने सुरू असणार आहेत. तर शनिवार, रविवारी अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहेत.

हेही वाचा - 'पंतप्रधान केवळ बैठका घेतात, लसीकरणाच्या धोरणाबाबत स्पष्टता नाही'

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.