ETV Bharat / state

महाराष्ट्रातील प्रमुख मंदिरांची 'कोविड लॉकडाऊन'नंतरची नवीन व्यवस्थापन प्रणाली प्रकाशित

author img

By

Published : Aug 14, 2020, 6:17 PM IST

प्रा. राजेंद्रकुमार सराफ म्हणाले, मार्गदर्शक पुस्तिकेमध्ये मंदिराचे अर्थकारण, कोविड विषाणू व भक्तांची तपासणी, कोविड लॉकडाऊननंतर मंदिर उघडण्यासाठी माहितीचे संकलन, मंदिर उघडण्याची पूर्वतयारी, भक्तांसाठी आचारसंहिता, मंदिर प्रथम कसे उघडावे, मंदिर आपत्ती व्यवस्थापन कार्यालय कसे असावे, अशा अनेक विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले आहे.

महाराष्ट्रातील प्रमुख मंदिरांची 'कोविड लॉकडाऊन'नंतरची नवीन व्यवस्थापन प्रणाली प्रकाशित
महाराष्ट्रातील प्रमुख मंदिरांची 'कोविड लॉकडाऊन'नंतरची नवीन व्यवस्थापन प्रणाली प्रकाशित

पुणे - भक्तांना मंदिरात असलेल्या त्यांच्या देवतांचे सुरक्षित व कोरोनाने संक्रमित न होता सगुण दर्शन घेता यावे, याकरिता कोविड लॉकडाऊननंतरची मंदिर व्यवस्थापनाची नवीन प्रणाली ही पुस्तिका महाराष्ट्रातील प्रमुख मंदिरांनी एकत्रित येऊन साकारली आहे. सध्या मंदिरे बंद असल्याने पुण्यामध्ये श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती मंदिरासमोर महाराष्ट्रातील मंदिर विश्वस्तांच्या हस्ते या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले.

प्रमुख मंदिरांची 'लॉकडाऊन'नंतरची नवीन व्यवस्थापन प्रणाली...

प्रा. राजेंद्रकुमार सराफ म्हणाले, मार्गदर्शक पुस्तिकेमध्ये मंदिराचे अर्थकारण, कोविड विषाणू व भक्तांची तपासणी, कोविड लॉकडाऊननंतर मंदिर उघडण्यासाठी माहितीचे संकलन, मंदिर उघडण्याची पूर्वतयारी, भक्तांसाठी आचारसंहिता, मंदिर प्रथम कसे उघडावे, मंदिर आपत्ती व्यवस्थापन कार्यालय कसे असावे, अशा अनेक विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले आहे.

महेश सूर्यवंशी म्हणाले, मंदिरे उघडून भाविकांना दर्शनासाठी खुली करताना ही पुस्तिका मार्गदर्शक ठरणार आहे. महाराष्ट्रातील अनेक प्रमुख देवस्थाने यामध्ये सहभागी आहेत. कोविड महामारीच्या काळात देवस्थानांनी एकत्र येऊन पुढील परिस्थितीशी कशाप्रकारे सामोरे जायचे, याकरीता एकत्रिकरण महत्वाचे होते. या उपक्रमामुळे सर्व देवस्थानांचे विश्वस्त एकत्र आले आहेत.

यावेळी पुस्तिकेचे लेखक व संकलक प्रा.राजेंद्रकुमार सराफ, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती पंढरपूरचे ह.भ.प.शिवाजीराव मोरे, श्री लक्ष्मी नरसिंह देवस्थान ट्रस्ट नीरा नरसिंहपूरचे विश्वस्त डॉ. प्रशांत सुरु, श्री आळंदी देवस्थानचे विश्वस्त अ‍ॅड. विकास ढगे पाटील, श्री देहू देवस्थानचे अध्यक्ष मधुकरराव मोरे, विश्वस्त अजितराव मोरे, श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, पुणे मनपा स्थायी समिती अध्यक्ष व ट्रस्टचे उत्सवप्रमुख हेमंत रासने, सुनील रासने आदी उपस्थित होते.
ह.भ.प.शिवाजीराव मोरे म्हणाले, महाराष्ट्रातील सर्व प्रमुख मंदिरांच्या विश्वस्तांशी संपर्क करुन एक चर्चासत्र व एक कार्यशाळा गुगल मिटवर आयोजित करण्यात आली होती. यात मंदिराचे विश्वस्त, प्रमुख पुजाऱ्यांनी सहभाग घेतला. कोविडच्या पार्श्वभूमीवर राज्यातील मोठी श्रद्धास्थाने, देवस्थान ट्रस्ट व मंदिर व्यवस्थापन समिती यांना एकत्र गुंफण्याचे काम यामुळे झाले आहे.

महाराष्ट्रातील अनेक देवस्थानांचा या उपक्रमाकरिता पुढाकार

श्री लक्ष्मी नरसिंह मंदिर (नीरा नरसिंगपूर), स्वामी स्वरुपानंद समाधी मंदिर (पावस), श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती (पंढरपूर), पश्चिम महाराष्ट्र मंदिर समिती, श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट (पुणे), श्री सिद्धेश्वर मंदिर (सोलापूर), चिंचवड देवस्थान ट्रस्ट, श्री तुळजाभवानी मंदिर (तुळजापूर), श्री देवदेवेश्वर संस्थान (पुणे), यमाई मंदिर (औंध), भगवान महावीर अहिंसा ट्रस्ट (निगडी), मांढरदेवी देवस्थान, श्री रेवणसिद्ध मंदिर (रेणावी) यांसह इतरही देवस्थाने याकरिता पुढे आली आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.