पुणे - कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात गेल्या 4 महिन्यांपासून सर्वच सार्वजनिक धार्मिक कार्यक्रमांना बंदी करण्यात आली आहे. यामुळे यंदा गणेशोत्सवावरही कोरोनाचे विघ्न आलं आहे. याचा फटका मूर्तीकारांनाही बसला आहे.
नेहमी वाजत गाजत येणाऱ्या आणि तेवढ्याच धुमधडाक्यात विसर्जन मिरवणुकीतून निरोप घेणाऱ्या गणरायाच्या उत्सवावरही यंदा करोनामुळे विघ्न आलं आहे. राज्याच्या गृहखात्याने एक नियमावली जाहीर केली आहे. त्यात गणपती बाप्पाच्या मूर्तीच्या उंचीपासून ते विसर्जनापर्यंत सर्व नियम देण्यात आले आहेत. त्यानुसार सार्वजनिक गणेश मंडळांच्या बाप्पाची मूर्ती जास्तीत जास्त चार फूट उंच असावी. तर घरी स्थापना करण्यात येणाऱ्या गणपतीची मूर्ती दोन फुटांपेक्षा अधिक नसावी, असे या नियमावलीत म्हटले आहे. या नियमावलीचा फटका सर्वाधिक मूर्तिकारांना बसला आहे.
हेही वाचा - बच्चन कुटुंबीयांमध्ये चार कोरोनाबाधित; पालिकेकडून सर्व बंगले सील
वर्षभराआधीच मूर्ती तयार करायला आम्ही सुरुवात करत असतो. दरवर्षी छोट्या मोठ्या मूर्ती तयार करत असतो. यंदाही अशा प्रकारच्या मुर्ती त्यांनी तयार केल्या आहेत. आधीच लॉकडाऊन काळात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जे साहित्य आणि पैसे होते त्यात मुर्ती बनवल्या. लॉकडाऊन काळात जे सामान मिळत नव्हते ते कुठुनतरी आणून कसेतरी काम चालू होते. या नंतर मूर्तींसाठी लागणारे सामानही महाग मिळायला लागले. लॉकडाऊनमुळे लोकांकडे पैसा नाही. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या.
मात्र, या नवीन नियमावलीनंतर आम्ही करायचे काय? मोठ्या मुर्ती कशा विकणार? गुंतवलेले पैसे कसे काढायचे? असे अनेक प्रश्न मूर्तिकारांसमोर उभे राहिले आहे, अशा भावना श्री. आर्टसचे श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केल्या.
- नवीन लॉकडाऊनचा बसणार फटका -
दरवर्षी यावेळेस साधारणत: ५० टक्क्यांच्या वर मुर्ती बुकिंग होत होत्या. मात्र, यंदा लॉकडाऊनमुळे आत्ता कुठेतरी दिवसा दहा-वीस मुर्ती बुकिंग होत होत्या. परत करत असलेल्या लॉकडाऊनमुळे याचा अजून मोठा फटका आम्हाला बसणार असल्याचेही शिंदे म्हणाले.
- ऑनलाईन सुरू केली विक्री -
लॉकडाऊनमुळे आम्ही सोशल मीडियाचा वापर करुन ऑनलाईन मूर्ती विकायला सुरुवात केली आहे. मात्र, पाहिजे तेवढा प्रतिसाद मिळला नाही आहे. ग्राहक इथे येऊनच विविध मुर्ती बघून मूर्ती खरेदी करत आहेत, अशी माहितीही शिंदे यांनी 'ईटीव्ही भारत'सोबत बोलताना दिली.