पुणे Star World Record Gift : वेग वेगळे विक्रम करण्याचा अनेकांचा संकल्प असतो. मात्र पिंपरी-चिंचवड शहरात आज एक अनोखा विक्रम नोंदविण्यात आला आहे. लग्नात आपण भेट वस्तू किंवा अंधांमधून संसार उपयोगी वस्तू देण्यात येत असल्याचं आपण अनेकदा बघत असतो. मात्र पिंपरी चिंचवड शहरांमध्ये एका लग्न सोहळ्यात चक्क 1375 गुलाबाच्या फुलांचा बुके देऊन विश्वविक्रम नोंदविण्यात आला आहे.
यापूर्वीचा १८१ विक्रमांची नोंद : एकामागून एक विक्रम करीत तब्बल १८१ विश्वविक्रम करणारा भारतीय अवलिया आहे दीपक हरके. अहमदनगर शहरात राहणाऱ्या दीपक हरके यांना असं विश्वविक्रम करण्याचा छंद जडला आहे. यापूर्वी त्यांनी केलेल्या १८१ विक्रमांची नोंद 'इंडिया स्टार वर्ल्ड रेकॉर्ड' मध्ये झाली आहे. या अनोख्या आणि वेगवेगळ्या विक्रमामुळं त्यांना फ्रान्स येथील थेम्स इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीने सन्माननीय डि. लीट. पदवी प्रदान केली आहे.
१३७५ गुलाबांच्या फुलांचा विश्व विक्रमी गुच्छ : डॉ. हरके यांनी रविवारी (दि.३१) पिंपरी-चिंचवड येथे त्यांचे भाचे नीरज नवनाथ घोंगडे आणि प्रतिक्षा प्रदीप उडगे यांच्या विवाह सोहळ्यानिमित्त १३७५ गुलाबांच्या फुलांचा विश्व विक्रमी गुच्छ भेट देऊन शुभेच्छा दिल्या. नीरजचे आजोबा सुरेश विश्वनाथ हरके यांच्याहस्ते हा विश्व विक्रमी गुच्छ आणि आजी संगीता सुरेश हरके यांच्याहस्ते 'इंडिया स्टार वर्ल्ड रेकॉर्ड' मध्ये नोंद झाल्याचं प्रमाणपत्र नव वधू वरांना देण्यात आलं. यावेळी संयोजक डॉ. दीपक हरके, नवनाथ घोंगडे, ज्योती घोंगडे, अनिकेत हरके, विहान हरके, सुप्रिया हरके, रमेश कुदरी, सुमित कुदरी, स्वाती कुदरी आदींसह वधू वरांचे नातेवाईक उपस्थित होते. डॉ. हरके यांच्या संकल्पनेतून अहमदनगर येथील शुभ फ्लॉवर्स अँड डेकोरेटर्सने हा गुच्छ सहा तासात बनविला आहे.
हेही वाचा -