ETV Bharat / state

जमिनीच्या वादातून पुतण्याने केला चुलतीचा खून

author img

By

Published : Jan 26, 2021, 7:01 AM IST

अनेकदा जमीनीच्या वादातून भावंडांमध्ये वाद आणि हाणामारीच्या घटना होतात. या वादातून काहीवेळा एखाद्याचा जीवही जातो. बारामती तालुक्यातही अशीच एक घटना घडली.

Murder
खून

पुणे(बारामती) - जमिनीच्या वादातून झालेल्या भांडणात पुतण्याने सख्ख्या चुलतीवर कुऱ्हाडीने वार करत तिचा खून केला. हा धक्कादायक प्रकार इंदापूर तालुक्यातील काटी येथे घडला.आशाबाई साहेबराव भोसले (रा.काटी,बिजलीनगर ता.इंदापूर) असे ठार झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी मृत महिलेचा मुलगा सचिन साहेबराव भोसले (वय ३०) यांनी इंदापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. स्वप्नील उर्फ योगेश विठ्ठल भोसले, विठ्ठल महादेव भोसले, लक्ष्मी विठ्ठल भोसले ( तिघे रा.काटी ता.इंदापूर) अशी आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी तात्काळ दोघांना अटक केली असून एका जखमी आरोपीवर रुग्णालयात उपचार सुरू आहे.

काय आहे प्रकरण -

२४ जानेवारीला सायंकाळी मेथीची भाजी आणण्यासाठी फिर्यादी व त्याची पत्नी जात असताना तेथे फिर्यादीचा चुलत भाऊ स्वप्नील भोसले हा वैरण घेऊन आला. त्यावेळी तू वैरण खालच्या रस्त्याने घेऊन जा, तुझ्या गाडीचा धक्का लागला तर आमची पाईपलाईन मोडेल, असे फिर्यादीने म्हटले. त्यानंतर आरोपीने त्याला शिविगाळ व दमदाटी करून धक्काबुक्की केली. त्यानंतर फिर्यादी व त्याची पत्नी आपल्या घरी आले. फिर्यादीचे वडील व आई अंगणात बसलेले होते. त्याच वेळी आरोपी स्वप्नील उर्फ योगेश विठ्ठल भोसले, आरोपीचे वडील विठ्ठल भोसले, लक्ष्मी भोसले हे शिविगाळ करत फिर्यादीच्या घरासमोर आले. भांडणाचा आवाज ऐकत फिर्यादीची आत्त्या विमल भिमराव सावंतही तिथे आल्या. यावेळी चुलत भाऊ स्वप्नील भोसले याच्या हातात कुऱ्हाड होती. तर चुलते विठ्ठल भोसले यांच्या हातामध्ये काठी होती. स्वप्नील याने आज तुम्ही आम्हाला जमीन दिली नाही, तर आता तुम्हाला जिवंत सोडणार नाही, असे म्हणत हातातील कुऱ्हाडीने फिर्यादीच्या आई आशाबाई भोसले यांच्या डोक्यत घाव घातला. तर चुलता विठ्ठल भोसले यांनी त्यांच्या हातातील काठीने आशाबाई व पत्नी शिवानी यांना मारहाण केली. त्यावेळी लक्ष्मी भोसले हिने देखील फिर्यादीच्या कुटुंबाला दगड फेकून मारले. यानंतर जखमी आशाबाईला खासगी गाडीतून सरकारी दवाखान्यात उपचारासाठी आणले मात्र, डाॅक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.