ETV Bharat / state

सीरम इन्स्टिट्युट आग प्रकरण : नीलम गोऱ्हेनी केली घटनास्थळाची पाहणी - पुणे ताज्या बातम्या

आज विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी या घटनास्थळाची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. तसेच काही लोक या घटने बाबत शंका घेत आहेत. त्यांच्याकडे काही पुरावे, असतील तर त्यांनी मुख्यमंत्री कार्यालयाला द्यावे, उगाच अफवा पसरवू नये, असेही त्यांनी यावेळी म्हटले.

neelam-gorhe-visited-serum-institute-in-pune
सीरम इन्स्टिट्युट आग प्रकरण : नीलम गोऱ्हेनी केली घटनास्थळाची पाहणी
author img

By

Published : Jan 22, 2021, 3:48 PM IST

पुणे - काल पुण्यातील सीरम इन्स्टिट्युटला आग लागली होती. या आगीत पाच जणांचा मृत्यू झाला होता. आज विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी या घटनास्थळाची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

नीलम गोऱ्हेंची प्रतिक्रिया

काही पुरावे असतील तर त्यांनी मुख्यमंत्री कार्यालयाला द्यावे -

सीरम इन्स्टिट्युटला ज्या इमारतीला आग लागलेल्या त्या इमारतीचे फायर ऑडिट झालेले होते. आता ते पुन्हा करण्यात येणार आहे. आग लागल्यानंतर काही वेळातच पाण्याचे फवारे असलेली यंत्रणा सुरू झाली होती, अशी माहिती नीलम गोऱ्हे यांनी दिली. तसेच काही लोक या घटने बाबत शंका घेत आहेत. त्यांच्याकडे काही पुरावे, असतील तर त्यांनी मुख्यमंत्री कार्यालयाला द्यावे, उगाच अफवा पसरवू नये, असेही त्यांनी यावेळी म्हटले. या घटनेमुळे इथले कर्मचारी, शास्त्रज्ञ यांच्या मनोबलावर कुठलाही परिणाम झालेला नसल्याचेही त्यांनी यावेळी म्हटले.

काल सीरमला लागली होती आग -

शहरातल्या मांजरी भागातील कोरोना प्रतिबंधात्मक लस बनवणाऱ्या सीरम इंस्टिट्यूटमध्ये गुरुवारी दुपारच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. या आगीत इमारतीच्या शेवटच्या मजल्यावर अडकलेल्या 5 जणांच्या मृत्यू झाला आहे. या आगीच्या घटनेची पाहणी करण्याकरीता मुख्यमंत्री ठाकरे आज पुणे दौऱ्यावर येत आहेत. ते आज दुपारी सीरम इन्स्टिट्यूटची पाहणी करणार आहेत. तत्पूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी सायंकाळीच सीरमला भेट देऊन झालेल्या नुकसानीची पाहणी केली होती. कोरोना महामारीवर दिलासा देणाऱ्या कोव्हिशिल्ड ही लस सीरम इंन्स्टिट्यूटने निर्माण केली आहे. देशासह शेजाजरच्या देशांना सीरमकडून लस पुरवठा करण्यात येत आहे.

हेही वाचा - मुलांना शाळेत पाठवण्याबाबत पालकांनी निर्णय घ्यावा- मुख्य कार्यकारी अधिकारी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.