पुणे - अमेरिका, स्पेन, इटली या देशांमध्ये कोरोनाची दुसरी लाट आली आहे, अशा बातम्या गेल्या आठ दिवसांपासून माध्यमांमध्ये येत आहेत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाचा धोका टाळण्यासाठी सावधानता बाळगण्याच्या केलेल्या आवाहनाला जनतेने प्रतिसाद द्यावा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले आहे.
हेही वाचा - राज्यातील महत्त्वाच्या दसरा महोत्सवांवर एक नजर; 'ईटीव्ही भारत'वर पाहा लाईव्ह...
कोरोनाच्या काळात राज्य सरकारने उत्तम काम केले आहे. राज्यातील मंत्र्यांनी विविध जिल्ह्यात दौरे करून त्या-त्या जिल्ह्यातील माहिती घेतली. आज जरी कोरोना रुग्णवाढीचे प्रमाण कमी झाले असले तरी गाफील राहू नका. सर्वानी नियमांचे पालन करा. अमेरिका, स्पेन, इटलीमध्ये दुसरी लाट आली आहे. कोरोनाच्या बाबतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद द्या, असे आवाहन यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले.