पुणे: कसबा पोटनिवडणूकीच्या प्रचाराची रणधुमाळी आज पाच वाजता थंडवणार आहे. या पार्श्वभूमीवर भाजप व महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा प्रचार जोरदार सुरू आहे. कसबा पोटनिवडणूकीच्या प्रचारात भाजप उमेदवार हेमंत रासने यांच्या प्रचारार्थ मुख्यमंंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः मैदानात उतरले आहेत. मुख्यमंत्री शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत रोड शोचे आज पुण्यात आयोजन करण्यात आले. पुण्यातील समता भूमी येथून या रोड शोला सुरूवात झाली. मुख्यमंत्री शिंदे यांचा हा रोड शो गुरूवार पेठपर्यंत पोहचला असताना राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून पक्षाचे झेंडे दाखवण्यात आले.
प्रचारासाठी रोड शोचे आयोजन: आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर कसबा पोटनिडणुक जाहीर करण्यात आली. कसबा पोटनिवडणूकीसाठी आज प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत रोड शोचे आयोजन करण्यात आले. या रोड शोची सुरूवात समता भूमी येथून होऊन बागवे कमान जनाई मळा, पालखी विठोबा चौक, हमाल तालीम, खाकसार मस्ज्जीद डाव्याबाजूने हिंदमाता चौक,साखळीपीर तालीम, तालीम लक्ष्मी रोड अल्पना टोकिज, हमजेखान चौक डाव्याबाजूने गोविंद हलवाई चौक, कस्तुरे चौक, मोमीनपुरा, विजय कदम चौक उजवीकडे सिंहगड गैरेज उजवीकडे सेंट हिल्डाज स्कूल, शितलादेवी चौक डावीकडे फडगेट पोलीस चौक आणि सेवा मित्र मंडळ येथील लालमहाल येथे समारोप झाला.
राष्ट्रवादी कॉंग्रेसची टीका: कसबा पोटनिवडणूकीच्या प्रचारासाठी काढण्यात आलेल्या रोड शोवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांनी टीका केली आहे. ते म्हणाले की, मुख्यमंत्री कोणाचे आहेत ते सर्वांनाच माहित आहे. ते भारतीय जनता पार्टीचे सैनिक म्हणून काम करतात. त्यामुळे भाजपा सांगेल तेच त्यांना करावे लागते म्हणून भाजपाने सांगितले असेल म्हणून ते आज प्रचार करत आहेत. पण ही लढाई धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी असून त्यात काँग्रेस विजय प्राप्त करेल आणि इतिहास घडवेल, असा विश्वास रवींद्र धंगेकर यांनी व्यक्त केला आहे.
मतदारसंघ छत्रपतींच्या विचारांचा: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कसबा हा हिंदुत्ववादी मतदार संघ आहे, असे म्हटले होते. यावर रवींद्र धंगेकर म्हणाले की, कसबा मतदारसंघ हा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचाराचा आहे. या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचे लहानपण गेले. आम्ही त्यांचा विचार पुढे नेत आहोत, त्यामुळे आम्हीच विजयी होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
धनशक्ती विरूद्ध जनशक्ती: रवींद्र धंगेकर पुढे म्हणाले की, भाजपाच्या रॅलीमध्ये जागोजागी मोठ्या जेसीबी लावून क्रेन लावून नेत्यांचे सत्कार होत आहेत. पैशाची उधळण होत आहे. कसबा निवडणूकीतील लढा हा धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असा आहे. या धनशक्तीच्या समोर जनशक्ती असलेला कार्यकर्ता जिवंत ठेवण्याचा आवाहन मी मतदारांना करतो. आम्ही इतिहास घडवलेला असेल, आणि तो इतिहास जिंकून घडवू, असा विश्वास रवींद्र धंगेकर यांनी व्यक्त केला आहे.
प्रचाराचा शेवटचा दिवस: कसबा विधानसभा पोटनिवडणुकीचा आजचा प्रचाराचा शेवटचा दिवस असून आज पाच वाजता प्रचाराच्या या तोफा थंडावणार आहेत त्यापूर्वीच आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेमंत रासने यांचा प्रचार करत आहेत तर रवींद्र दांडेकर यांनी स्वतः रॅली काढून स्वतःचा प्रचार केलेला आहे आणि जिंकण्याचा विश्वास सुद्धा व्यक्त केला आहे.
हेही वाचा: Sharad Pawar on Election : राज्यात मध्यावधी निवडणुकीची शक्यता नाही; शरद पवारांची स्पष्टोक्ती