ETV Bharat / state

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पवार कुटुंबाकडून दिवाळी घरीच साजरी; कार्यकर्त्यांच्या भेटी रद्द

पाडव्यानिमित्त राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना प्रतिभा पवार यांना औक्षण केले. उपमुख्यमंत्री अजित पवारांना सुनेत्रा पवारांनी तर सदानंद सुळे यांना सुप्रिया सुळे यांनी औक्षण केले. तर आमदार रोहित पवार यांना त्यांच्या पत्नी कुंती पवार यांनी औक्षण केले.

author img

By

Published : Nov 16, 2020, 7:32 PM IST

Updated : Nov 16, 2020, 9:16 PM IST

शरद पवार व कुटुंबीय
शरद पवार व कुटुंबीय

बारामती (पुणे) - कोरोनामुळे पवार कुटुंबियांनी पाडवा घरगुती साजरा केला. बारामतीतील शरद पवार यांच्या गोविंद बाग या निवासस्थानी पाडव्याचा सण साजरा केला. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे कार्यकर्त्यांना दरवर्षीप्रमाणे शरद पवार यंदा भेटले नाहीत.

पाडव्यानिमित्त राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना प्रतिभा पवार यांना औक्षण केले. उपमुख्यमंत्री अजित पवारांना सुनेत्रा पवारांनी तर सदानंद सुळे यांना सुप्रिया सुळे यांनी औक्षण केले. तर आमदार रोहित पवार यांना त्यांच्या पत्नी कुंती पवार यांनी औक्षण केले. दरवर्षी दिवाळीच्या पाडव्याला राज्यभरातून राष्ट्रवादीचे कार्यकर्ते पवार कुटुंबियांना भेटण्यासाठी बारामतीत येत असतात. परंतु कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यंदा शरद पवार बाहेरील लोकांना भेटले नाहीत.

पवार कुटुंबाकडून दिवाळी घरीच साजरी

पवार कुटुंबाची एकत्रित दिवाळी साजरा करण्याची परंपरा-

संपूर्ण पवार कुटुंबीय एकत्र येऊन बारामतीत दिवाळी सण साजरा करतात. पवार कुटुंतील सदस्य वेगवेगळ्या कामानिमित्त वर्षभर देश-विदेशात असतात. त्यामुळे कुटुंबीयांपैकी अनेकांची एकमेकांशी गाठभेट होत नसल्याने वर्षातून काही दिवस तरी सर्वांनी एकत्रित यावे, अशी भावना आप्पासाहेब पवार यांची होती. त्याप्रमाणे पवार कुटुंब दिवाळीनिमित्त एकत्रित येतात.

Last Updated : Nov 16, 2020, 9:16 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.