पुणे : आपले राजकीय गुरू दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दर्शन घेतले. आता पक्ष बांधणीसाठी उद्यापासून महाराष्ट्रभर जाणार असल्याचे शरद पवारा यांनी प्रीतिसंगमावरील सभेत सांगितले. यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. महाराष्ट्रात उलथापलथ करण्याची भूमिका घेऊन राष्ट्रवादी फोडणाऱ्यांना येत्या काळात जनताच उत्तर देईल, असा इशारा शरद पवार यांनी दिला.
तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न- राज्यात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे. एकोप्याने राहणाऱ्या समाजात जातीय दंगे घडविण्यात आल्याचा आरोप शरद पवारांनी केला. लोकशाहीचा अधिकार जतन करण्याची गरज असून काही शक्ती हुकुमशाही पद्धतीने काम करत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकर यांच्या महाराष्ट्रात चुकीचा प्रवृत्ती डोके वर काढत आहेत, असे पवार म्हणाले. महाराष्ट्र आणि देशात जातीय धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न आणि फोडफोडीच्या भाजपच्या प्रवृत्तीला काही लोक बळी पडले. परंतु, या फोडाफोडीचा त्यांना काही फायदा होणार नाही, असा टोला शरद पवारांनी लगावला.
समाधीसारखे ठिकाण नाही- शरद पवार यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या राजकीय कार्याचा आणि प्रीतिसंगमावरील समाधीच्या पवित्र ठिकाणाचा उल्लेख केला. महाराष्ट्रभर जात असताना गुरूंचा आशिर्वाद महत्वाचा होता. त्यात आज गुरू पौर्णिमा असल्याने प्रीतिसंगमाशिवाय आशिर्वाद घेण्यासाठी दुसरे योग्य ठिकाण असूच शकत नाही, असे सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी बंड केल्यानंतर राष्ट्रवादी पक्षात उभी फूट पडली आहे. अजित पवार यांच्यासोबत तब्बल 40 आमदार त्यांच्यासोबत असल्याचा दावा करण्यात येत आहे. मात्र अजित पवार यांच्या बंडाबाबत शरद पवार रान उठवणार असल्याचे दिसून येत आहे.
भाजपच्या डावपेचांना बळी पडले : कराडमध्ये आज हजारो समर्थक आणि राष्ट्रवादीचे स्थानिक आमदार बाळासाहेब पाटील यांनी शरद पवार यांचे स्वागत केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना आणि समर्थकांना संबोधित करताना शरद पवार म्हणाले, आमच्या पक्षातील काही लोक भाजपच्या डावपेचांना बळी पडले आहेत. ते म्हणाले, महाराष्ट्र आणि देशात जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. शांतताप्रिय नागरिकांमध्ये भीती निर्माण करणाऱ्या शक्तींशी आपण लढले पाहिजे. देशातील लोकशाहीचे रक्षण करणे गरजेचे आहे. शरद पवारांचे पुतणे अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्याच्या दुसऱ्याच दिवशी गुरुपौर्णिमेच्या मुहूर्तावर दिवंगत चव्हाण यांच्या 'प्रितिसंगम'ला दिलेल्या भेटीकडे त्यांच्या ताकदीचे प्रदर्शन म्हणून पाहिले जात आहे.
कार्यकर्ते यशवंतराव चव्हाण स्मृतीस्थळी दाखल : कराड येथील यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीस्थळी सकाळपासूनच मोठ्या संख्येने कार्यकर्ते हे जमायला सुरवात झाली आहे. आम्ही शरद पवार साहेबांच्या सोबत आहोत, असे फ्लेक्स हातात घेत कार्यकर्ते हे यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीस्थळी दाखल झाले आहे. थोड्याच वेळात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे देखील तिथे पोहचून समाधीचे दर्शन घेणार आहे. कार्यकर्त्यांना तेथूनच संबोधित करणार असल्याचे सांगितले जात आहे.
सातारा दौऱ्यात शक्तीप्रदर्शन करणार : शरद पवार आज सातारा दौऱ्यावर असून शक्तीप्रदर्शन करणार आहेत. यासाठी ते सकाळी घरातून निघाले आहेत. यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन करून ते नव्या पर्वाला सुरूवात करणार आहेत. राज्यात रविवारी घडलेल्या राजकीय घडामोडींवर शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेतली होती, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, त्यांना सोडून गेलेल्या कार्यकर्त्यांच्या राजकीय भविष्याची चिंता आहे, असे सांगितले होते. पत्रकारांनी त्यांना राष्ट्रवादीतील आश्वासक चेहरा कोण, असा प्रश्न विचारला होता. त्यावर त्यांनी शरद पवार असे नाव दिले.
हेही वाचा :
- Maharashtra Political Crisis: शरद पवार कराडला रवाना; कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी
- NCP Political Crisis : आम्ही नेहमी शरद पवारांसोबत; राष्ट्रवादीच्या तरुण कार्यकर्त्यांची पवारांच्या घराबाहेर घोषणाबाजी
- Maharashtra Political Crisis : राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा भविष्यातील आश्वासक चेहरा कोण? शरद पवार म्हणाले...