ETV Bharat / state

Amol Kolhe on Onion Issue: मंत्री गावात आल्यास कांद्याचा हार घालून सत्कार करा- डॉ. अमोल कोल्हे

कांदा प्रश्नावरून खासदार अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी महाविकास आघाडीच्या वतीनं पुणे जिल्ह्यातील आळेफाटा चौक येथील महामार्गावर 'रास्ता रोको' आंदोलन करण्यात आलं. खासदार अमोल कोल्हे यांनी गळ्यात कांद्याची माळ टाकत केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. यावेळी आंदोलनात मोठ्या प्रमाणावर कांदा उत्पादक शेतकरी उपस्थित होते. आज कांदा खरेदी विक्री संपाचा तिसरा दिवस आहे.

MP Amol kolhe
खासदार अमोल कोल्हे
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 23, 2023, 10:59 AM IST

Updated : Aug 23, 2023, 2:46 PM IST

पुणे : केंद्र सरकारनं देशातंर्गत बाजारपेठेत कांद्याचे दर वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन निर्यातीवर तब्बल 40 टक्के शुल्क लावल्याचा निर्णय घेतला. 31 डिसेंबरपर्यंत कांदा निर्यातीवर शुल्क लावलं आहे. या विरोधात शेतकरी आक्रमक झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे हेदेखील केंद्र सरकारच्या या निर्णयावर आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय. यावेळी केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवर जो 40 टक्के शुल्क लावण्याचा घेतलेला निर्णय दुर्दैवी आणि शेतकऱ्यांच्या ताटात माती कालवणारा असल्याची टीका त्यांनी केली.

महागाईवर नियंत्रण आणण्यात केंद्र सरकारला अपयश : लवकरच 4 राज्यात होणाऱ्या निवडणुका आणि पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महागाईवर नियंत्रण आणण्यात केंद्र सरकार पूर्णपणे अपयशी ठरलं. त्यावर उपाययोजना न करता तात्पुरती मलमपट्टी करण्याच्या नावाखाली सर्वसामान्य शेतकऱ्यांचा बळी दिला जातोय, हे अत्यंत दुर्दैवी आहे, अशी टीका डॉ. अमोल कोल्हे यांनी केली.

शेतकऱ्याचं स्वप्न धुळीस मिळवलं : ते पुढे म्हणाले की, गेली 4 ते 5 वर्ष कांद्याला बाजारभाव नाही. कित्येकदा कांद्याचा वाहतूक खर्च देखील शेतकऱ्यांवर पडलेला पाहायला मिळाला आहे, असं असताना शेतकऱ्यांचे अश्रू पुसायला केंद्र सरकार पुढे आलेलं नाही. आत्ता कुठेतरी शेतकऱ्याला चार पैसे मिळण्याची अपेक्षा असताना त्याचं स्वप्न धुळीस मिळवण्याचं काम मोदी सरकारने केलंय. या विरोधात हे आंदोलन असल्याचं डॉ. कोल्हे यांनी सांगितलं.

कांद्याचा हार घालून सत्कार : राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे सध्या दिल्ली दौऱ्यावर असताना खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी टीका केली. धनंजय मुंडे यांनी केंद्रीय कृषी मंत्र्यांसमोर कांद्याच्या निर्यातीवर लावलेल्या कराचा विषय मांडावा. मी स्वतः कांद्याचा हार घालून त्यांचा सत्कार करेन, असं ते म्हणाले. कांदाप्रश्न जोपर्यंत मार्गी लागत नाही, तोपर्यंत कोणताही मंत्री गावात आला की, त्या मंत्र्यांचा सत्कार कांद्याचा हार घालून करा, असं आवाहन डॉ. कोल्हे यांनी राज्यांतील सर्व शेतकऱ्यांना केलं..

केंद्र आणि राज्य सरकारला इशारा : शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसण्याचे काम करू नका, कांद्याला हमीभाव द्या. त्याशिवाय तुम्हाला सुट्टी नाही, असं म्हणत त्यांनी आंदोलन स्थळावरुन थेट केंद्र आणि राज्य सरकारला इशारा दिलाय. आता भाव लढवून मिळवावा लागणार, असं आवाहनही त्यांनी शेतकऱ्यांना केलंय. जर कांद्याला ३५०० हजार हमीभाव दिला नाही, तर आधी मुंबई, त्यानंतर दिल्ली दरबारी कांद्याचा लढा धडकणार, असल्याचं खासदार कोल्हेंनी जाहीर केलंय. (Amol Kolhe protest against Modi govt)

हेही वाचा :

  1. Amol Kolhe criticism Shivajirao Patil: तुम्ही तर अडचणीत उद्धव ठाकरे यांना सोडलं...मी तर पवार साहेबांच्या सोबतच - अमोल कोल्हे
  2. Amol Kolhe MP Candidate : ठरलं! 'या' मतदारसंघासाठी अमोल कोल्हे यांच्या नावावर राष्ट्रवादीकडून शिक्कामोर्तब
  3. Amol Kolhe Resign: खासदार डॉ. अमोल कोल्हे आपल्या खासदारकीचा राजीनामा देणार, शरद पवारांसोबत पक्षात कार्यकर्ता म्हणून काम करणार

Last Updated : Aug 23, 2023, 2:46 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.