ETV Bharat / state

बाबासाहेबांच्या स्मारकाबाबत उत्सुकता - सुप्रिया सुळे; स्मारकाच्या कामाची केली पाहणी

कोरोनामुळे काम धिम्या गतीने सुरू होते. मात्र, आता पुन्हा हे काम जलद गतीने सुरू झाले. ही वास्तू आमच्या सर्वांसाठी महत्त्वाची वास्तू राहणार आहे. त्यामुळे त्याचे कामाची पाहण्यासाठी आज आलो होतो, असे त्या म्हणाल्या.

ncp leader supriya sule visits indu mill and see dr babasaheb ambedkar statue construction mumbai
स्मारकाच्या कामाची केली पाहणी
author img

By

Published : Dec 4, 2020, 5:38 PM IST

Updated : Dec 4, 2020, 7:28 PM IST

मुंबई - दादर येथील इंदू मिल परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक उभारण्यात येत आहे. आज (शुक्रवारी) राष्ट्रवादी काँगेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी या बाबासाहेबांच्या स्मारकाची कामाची पाहणी केली. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक 2023मध्ये पूर्ण केले जाईल, असा विश्वास व्यक्त केला. तसेच आमचे राजकारण हे शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचारांचे आहे. यामुळे या स्मारकाबाबत आमच्या सर्वांच्या मनात उत्सुकता आहे, असेही त्या म्हणाल्या.

खासदार सुप्रिया सुळे आणि राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे याबाबत प्रतिक्रिया देताना.

कोरोनामुळे काम धिम्या गतीने सुरू होते. मात्र, आता पुन्हा हे काम जलद गतीने सुरू झाले. ही वास्तू आमच्या सर्वांसाठी महत्त्वाची वास्तू राहणार आहे. त्यामुळे त्याचे कामाची पाहण्यासाठी आज आलो होतो, असे त्या म्हणाल्या. यावेळी त्यांच्यासोबत राज्यमंत्री प्राजक्त तनपुरेही उपस्थित होते.

हेही वाचा - महाविकास आघाडी सरकारच्या कामावर जनतेचे शिक्कामोर्तब; मंत्री गुलाबराव पाटील

आत्मचिंतन करणार -

महाविकास आघाडीच्या विजयाबाबत बोलताना या विजयानंतर आमच्यावरील जबाबदारीदेखील खूप वाढली आहे. यासोबतच आमच्या ज्या दोन जागा गेल्या आहेत, त्याबाबत आम्ही आत्मचिंतन करण्याची गरज आहे. यातील धुळे-नंदुरबारची जागा आहे. त्या जागेवर अमरीश पटेल निवडून आले आहेत. ते आमच्याकडे असते तर आणखी भरभरून मतांनी निवडून आले असते. तर अमरावतीच्या जागेबाबतही आम्ही आत्मचिंतन नक्कीच करू, असे त्या म्हणाल्या.

Last Updated : Dec 4, 2020, 7:28 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.