ETV Bharat / state

सत्तेचे दार बंद झाल्यानेच भाजपचे घंटानाद आंदोलन - रुपाली चाकणकर

author img

By

Published : Aug 30, 2020, 3:01 PM IST

कोरोनाचा वाढता संसर्ग टाळण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात मागील चार ते पाच महिन्यांपासून सर्व धार्मिक स्थळे बंद आहेत. आता राज्यातील मंदिरे खुली करावीत या मागणीसाठी भाजपकडून शनिवारी राज्यभरात आंदोलन करण्यात आले. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी सणसणीत टीका केली.

Rupali Chakankar
रुपाली चाकणकर

पुणे - राज्यात भाजपकडून मंदिरे उघडण्यासाठी राज्यव्यापी आंदोलन करण्यात येत आहे. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी सणसणीत टीका केली आहे. मंदिर, मस्जिद, देव-देवता हा आपल्या सर्वांच्या श्रद्धेचा विषय आहे. त्यावर कोणाची मक्तेदारी नाही. कोरोना महामारीचे संकट अखंड मानवजातीवर ओढवलेले असताना विरोधकांकडून राजकीय हित डोळ्यासमोर ठेऊन घंटानाद आंदोलन करण्यात आले. सत्तेची दारे बंद झाल्यानेच भाजप घंटानाद आंदोलन करत आहे, अशी टिका त्यांनी ट्विटरद्वारे केली.

  • सत्तेच दार बंद झाल्याने भाजपचं घंटानाद...

    मंदीर, मस्जिद, देव देवता हा आपल्या सर्वांच्या श्रद्धेचा विषय आहे.त्यावर कोणाची मक्तेदारी नाही.कोरोना महामारीचं संकट अखंड मानवजातीवर ओढवलेलं असताना विरोधकांकडून राजकीय हित डोळ्यासमोर ठेऊन घंटानाद आंदोलन करण्यात आलं.(१/२)@MHVaghadi

    — Rupali Chakankar (@ChakankarSpeaks) August 29, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

कोरोनाचा वाढता संसर्ग टाळण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात मागील चार ते पाच महिन्यांपासून सर्व धार्मिक स्थळे बंद आहेत. आता राज्यातील मंदिरे खुली करावीत या मागणीसाठी भाजपकडून शनिवारी राज्यभरात आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात भाजपसह अनेक धार्मिक संघटना आणि संस्थाही सहभागी झाल्या होत्या. राज्य सरकार मॉल, दारूची दुकाने उघडू शकतो तर मंदिरे उघडण्याला विरोध का? असा सवाल या आंदोलनातून सरकारला विचारण्यात आला होता.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.