ETV Bharat / state

पिंपरी-चिंचवड महापालिकेतील राष्ट्रवादीच्या विद्यमान नगरसेवकाचा कोरोनामुळे मृत्यू - कोरोनामुळे नगरसेवकाचा मृत्यू

पिंपरी चिंचवड महानगर पालिकेचे माजी विरोधी पक्ष नेते आणि राष्ट्रवादीच्या एका विद्यमान नगरसेवकाचा आज सकाळी कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर पिंपरी-चिंचवडमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. या दुःखद घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

pcmc
पिंपरी चिंचवड महापालिका
author img

By

Published : Jul 4, 2020, 10:38 AM IST

पुणे - शहरासह जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. कोरोनाने बळी जाणाऱ्यांच्या संख्येतही वाढ होत आहे. याचा फटका लोकप्रतिनीधींनाही बसत आहे. आज पिंपरी चिंचवड महानगर पालिकेचे माजी विरोधी पक्ष नेते आणि राष्ट्रवादीच्या एका विद्यमान नगरसेवकाचा आज सकाळी कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर पिंपरी-चिंचवडमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. या दुःखद घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

कोरोनामुळे मृत्यू झालेले या नगरसेवकाने लॉकडाऊन काळात अनेक गरजुंना मदत केली होती. दरम्यान, त्यांना २५ जून रोजी कोरोना विषाणूची बाधा झाल्याचं स्पष्ट झाले होते. त्यांच्यावर पिंपरी-चिंचवडमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. परंतु, आज सकाळी त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

चिखली येथून ते तीन वेळेला नगरसेवक म्हणून निवडून आलेले होते. महानगर पालिकेच्या विरोधी पक्षाच्या धुरा सांभाळताना त्यांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले होते. नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी ते नेहमी अग्रेसर असायचे. कचरा प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी चक्क महानगर पालिकेच्या मुख्य दालनात कचरा आणून टाकला होता. संबंध लोकप्रतिनिधी आणि पालिका अधिकाऱ्यांचे लक्ष वेधून घेत. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे ते निकटवर्तीय होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.