ETV Bharat / state

जनतेच्या मनातील सरकार आणण्यासाठी पवारसाहेबांचा प्रयत्न - जयंत पाटील - शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीची पुण्यात बैठक

सध्याच्या राजकीय घडामोडींवर चर्चा करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीच्या बैठकीला थोड्याचे वेळात पुण्यात सुरुवात होणार आहे.

राष्ट्रवादी कोअर कमिटीच्या बैठकीला थोड्याच वेळात सुरुवात
author img

By

Published : Nov 17, 2019, 4:54 PM IST

Updated : Nov 17, 2019, 7:45 PM IST

पुणे - सध्याच्या राजकीय घडामोडींवर चर्चा करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीची आज पुण्यात बैठक होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत शिवाजीनगरमधील मोदीबागेत (शरद पवारांचे निवासस्थान) ही बैठक होणार आहे. दरम्यान, जनतेच्या मनातील सरकार आणण्यासाठी पवारसाहेब प्रयत्न करत असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी बैठकीपूर्वी दिला.

जयंत पाटील

या बैठकीसाठी खासदार सुप्रिया सुळे, आमदार जितेंद्र आव्हाड, आमदार हसन मुश्रीफ, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार धनंजय मुंडे, प्रवक्ते आमदार नवाब मलिक, खासदार सुनिल तटकरे, आमदार दिलीप वळसे पाटील हे याठिकाणी दाखल झाले आहेत. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे ३ पक्ष मिळून सत्ता स्थापन करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. सत्ता स्थापन करताना पक्षाची नेमकी काय भूमिका असेल यावर चर्चा करण्यासाठी ही बैठक आयोजीत केली आहे.

१४ ते १५ आमदार संपर्कात

जवळपास १४ ते १५ आमदार आमच्या संपर्कात असल्याचे वक्तव्य जयंत पाटील यांनी केले. मात्र, मी त्यांची नावे आत्ताच जाहीर करणार नसल्याचे पाटील म्हणाले. तसेच येणाऱ्या काळात आम्ही मेगाभरती करणार नसून मेरीट भरती करणार असल्याचे ते म्हणाले.

Intro:Pune:-
राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीची बैठकीला पुण्यात थोड्याच वेळात सुरवात होणार आहे..शिवाजीनगर परिसरातील मोदीबागेत ही बैठक होणार आहे..शरद पवार यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या बैठकील उपस्थित राहण्यासाठी खासदार सुप्रिया सुळे, जितेंद्र आव्हाड, हसन मुश्रीफ, जयंत पाटील, धनंजय मुंढे, नवाब मलिक, दिलीप वळसे पाटील याठिकाणी आले आहेत..Body:...Conclusion:...
Last Updated : Nov 17, 2019, 7:45 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.