ETV Bharat / state

मी निवडणूक लढवणार नाही; शरद पवारांची घोषणा, पार्थ पवार मावळमधून लढण्याचे संकेत - pawar

शरद पवार हे माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचे निश्चित मानले जात होते. तसे त्यांनी संकेतही दिले होते. मात्र, अचानक शरद पवारांनी आपला निर्णय बदलत मी लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

शरद पवार, पार्थ पवार
author img

By

Published : Mar 11, 2019, 5:43 PM IST

पुणे - परिवारामधून अधिक उमेदवार नको म्हणून मी माढ्यातून लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले. मी आत्तापर्यंत १४ निवडणुका लढवल्या आहेत. एकदाही पराभव झाला नाही, त्यामुळे आजवरचा इतिहास पाहता मी निवडणुकीला घाबरण्याचा प्रश्नच नसल्याचे पवार म्हणाले. दरम्यान पार्थ पवारांचीही मावळमधून उमेदवारी निश्चित मानली जात आहे.

शरद पवार निवडणूक लढवणार नाहीत

शरद पवार हे माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचे निश्चित मानले जात होते. तसे त्यांनी संकेतही दिले होते. मात्र, अचानक शरद पवारांनी आपला निर्णय बदलत मी लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. नविन पिढीला संधी देणार असल्याने त्यांनी हा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. दरम्यान मावळमधून पार्थ पवार यांना उमेदवारी देण्याची आग्रही मागणी स्थानिक कार्यकर्ते आणि शेतकरी कामगार पक्षाने केली आहे. त्या पार्श्वभूमीवर पार्थ यांचीही मावळमधून उमेदवारी निश्चित मानली जात आहे.

अहमदनगरमध्ये राष्ट्रवादीचाच उमेदवार...

दक्षिण अहमदनगरमधून राष्ट्रवादीचाच उमेदवार लढणार असल्याचेही पवार म्हणाले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेशी माझी बोलणी झाली आहेत. त्यांच्या सूचनेप्रमाणे जागा सोडण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. मी आजवर कधीही प्रकाश आंबेडकर यांच्याशी बोललो नसल्याचेही पवार म्हणाले. आमची यादी तयार आहे आम्ही काँग्रेसची वाट पाहत असल्याचेही पवार म्हणाले.

Intro:mh pune 01 11 shard pawar on madha loksabha pkg 7201348Body:mh pune 01 11 shard pawar on madha loksabha pkg 7201348

Anchor
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी माढा लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवणार नसल्याचे संकेत दिले आहेत पक्षाने अद्याप माढा लोकसभा मतदारसंघ यातील उमेदवाराचा बाबत निर्णय घेतलेला नाही स्थानिक कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे आपण या लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवावी का याबाबत विचार करत होतो मात्र दुसऱ्या बाजूला मावळ लोकसभा मतदार संघातून आपले नातू पार्थ पवार यांच्या नावाचा आग्रह जोरकसपणे सुरू सुरू झाला आहे शेकापचे नेते जयंत पाटील यांनीही पार्थ पवार यांच्या नावाचा आग्रह धरला आहे त्यामुळे एकीकडे बारामतीतून मुलगी सुप्रिया सुळे तसंच मावळमधून नातू पार्थ पवार आणि महिन्यातील स्वतः उभं राहायचं असेल तर एक पक्ष म्हणून ते योग्य होणार नाही असा विचार करून आपण म्हाडा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक न लढण्याचा च्या विचाराप्रत आल्याचं शरद पवार यांनी सोमवारी सांगितलं माढा लोकसभा मतदार संघाच्या उमेदवारीबाबत पुण्यातल्या बारामती हॉस्टेल येथे म्हाडा लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस तसेच शेकापच्या नेत्यांची बैठक शरद पवार यांचे नेतृत्वाखाली पुण्यातल्या बारामती हॉस्टेल येथे झाले त्यानंतर शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत आपण म्हाडा लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढणार नसल्याचे संकेत देत पवार परिवारातून सुप्रिया सुळे आणि पार्थ पवार हे लोकसभेचे उमेदवार असतील असे संकेत दिले आहेत म्हाडा लोकसभा मतदारसंघातून शरद पवारांची माघार अशा प्रकारच्या ज्या चर्चा सुरू आहेत त्यांना काही अर्थ नसून आतापर्यंत 14 निवडणुका लढले लो आहे आणि एकदाही पराभव पाहिलेला नाही त्यामुळे पुन्हा पंधराव्या वेळा निवडणूक लढण्यासाठी कुठलीही भीती नव्हती गेल्यावेळी जिल्हात लाट म्हणत होते त्या लागते नंतरही आपला विजय झाला होता आणि आता तर परिस्थिती अनुकूल आहे अशा वेळी माघार घेण्याचं कारण नाही जे कारण आहे ते एकाच कुटुंबातील किती जणांना उमेदवारी द्यायची हा मुद्दा असल्याने नातू साठी आपण निवडणूक लढवणार नसल्याचं शरद पवार यांनी सांगितले
Byte शरद पवार, नेते राष्ट्रवादी काँग्रेसConclusion:

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.