पुणे - पंडित भीमसेन जोशी यांनी देश एकसंध ठेवण्यासाठी प्रादेशिक आणि सामाजिक ऐक्य राखण्यासाठी सुरांच्या माध्यमातून महत्त्वाची भूमिका बजावली. त्यामुळे त्यांना भारतरत्न पुरस्काराने गौरविण्यात आले. त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा तीन दिवसांचा संगीत महोत्सव उपक्रम पुणेकर रसिकांसाठी अभूतपूर्व संधी आहे. देशात महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न यासारखे अनेक प्रश्न असताना त्याचा परिणाम होऊ न देता देश एकसंघ ठेवण्यामध्ये पंडित भीमसेन जोशी यांनी योगदान दिले आहे. तसेच पुण्याची सांस्कृतिक उंची वाढविण्यासाठी या महोत्सवाचा उपयोग होईल, असे गौरावोद्गार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी आढले आहेत.
स्वरभास्कर पंडित भीमसेन जोशी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त संगीताचार्य पंडित द. वि. कणेबुवा प्रतिष्ठानतर्फे आयोजित खयाल यज्ञ संगीत महोत्सव सुरू आहे. याच्या तिसऱ्या दिवशी पवार यांनी हजेरी लावली. यावेळी पंडित भीमसेन जोशी जन्मशताब्दी समितीचे अध्यक्ष खासदार गिरीश बापट, खासदार श्रीनिवास पाटील आदी. मान्यवर उपस्थित होते.
हेही वाचा - 'निदान सावरकर परजीवी किंवा आंदोलनजीवी होते असे म्हणू नका'
देश एकसंघ ठेवण्यासाठी पंडित भीमसेन जोशी यांचे योगदान -
ख्याल गायकी हे पंडितजींचे वैशिष्ट होते. आपल्याला अनेकांना भीमसेन जोशी यांचे सूर ऐकायला मिळाले. ते आपण कधीच विसरू शकत नाही. काणेबुवा प्रतिष्ठान या जन्मशताब्दी निमित्ताने वर्षभर कार्यक्रमाचे आयोजन केले आहे, ही महत्त्वाची गोष्ट आहे. पुण्याची संस्कृती वाढविण्यासाठी या महोत्सवाचा उपयोग होणार आहे. देशात महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न यासारखे अनेक प्रश्न असताना त्याचा परिणाम होऊ न देता देश एकसंघ ठेवण्यामध्ये पंडित भीमसेन जोशी यांनी योगदान दिले आहे, असेही यावेळी पवार म्हणाले.