पुणे - निलंगा येथील 64 वर्षीय अब्दुल गणी खडके यांनी 22 वर्षांपासून निलंगा ते काटेवाडी असा 310 किमी अंतर सायकलवरून प्रवास करत शरद पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याचा आगळावेगळा उपक्रम केला आहे. पवार यांचे जन्मठिकाण असलेल्या काटेवाडीमध्ये गेल्या 22 वर्षांपासून गणी पवारांचा वाढदिवस साजरा करतात.
हेही वाचा - B'Day Special : बारामतीकारांनी अनुभवलेले शरद पवार...
एकीकडे निष्ठा संपत चाललेली असताना अब्दुल गणी खडके यांनी आपल्या नेत्याप्रती असलेली निष्ठा दाखवून दिली आहे. 12 डिसेंबरला शरद पवार यांचा वाढदिवस असतो. त्यानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्यासाठी गणी यांनी तब्बल तीनशे किलोमीटर सायकल प्रवास केला आहे. शरद पवार यांनी आजपर्यंत समाजातल्या प्रत्येक घटकासाठी जे काम केले आहे, ते न विसरता येणारे आहे. त्यामुळेच मी या जाणत्या राजाला शुभेच्छा देण्यासाठी सायकलवरून येत असल्याचे गणी यांनी यावेळी सांगितले.
यश अपयशातून उभे राहण्याची उर्जा आईकडून मिळाली - शरद पवार
माझ्या मातोश्रींनी मोठे कष्ट घेऊन आम्हाला वाढवले. त्या शेती करायच्या तर वडील नोकरी करायचे. शेतीत पीकलेले धान्य बाजारापर्यंत नेण्याची व्यवस्थाही ते करायचे. साधारण १९३६ चा काळ असेल, आमच्या मातोश्री लोकल बोर्डावर होत्या. आपल्या समाजाचा विकास कसा करायचा? या विचारांच्या त्या होत्या. मुलींच्या शिक्षणासाठी त्या सदैव आग्रही राहत. त्यांच्या पावलांवर पाऊल ठेवत आम्ही सारे कार्यरत असल्याचे शरद पवार आज एका कार्यक्रमात म्हणाले.
हेही वाचा - यश अपयशातून उभे राहण्याची उर्जा आईकडून मिळाली - शरद पवार