ETV Bharat / state

Chinchwad Kasba Assembly By Election: चिंचवड मतदार संघासाठी राष्ट्रवादीकडून नाना काटे अर्ज भरणार - Kasba Assembly by Election latest news

केंद्रीय निवडणूक आयोगाने पुण्यातील कसबा मतदारसंघ तसेच चिंचवड मतदारसंघीची पोटनिवडणूक जाहीर केली आहे. कसबा विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मुक्ता टिळक तसेच चिंचवड मतदारसंघाचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागांवर ही पोटनिवडणूक होत आहे. चिंचवड मतदार संघासाठी राष्ट्रवादीकडून नाना काटे अर्ज भरणार आहेत.

Chinchwad Kasba Assembly Election
चिंचवड मतदार संघ
author img

By

Published : Feb 7, 2023, 11:58 AM IST

पुणे : कसबा विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मुक्ता टिळक आणि चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागांसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. या जागांवर केंद्रीय निवडणुक आयोगाने पोटनिवडणूक जाहीर केली आहे. येत्या २७ फेब्रुवारी २०२३ रोजी या दोन्ही जागांसाठी मतदान प्रकिया पार पडणार आहे. तर, २ मार्च रोजी मतमोजणी होणार आहे.

मोर्चेबांधणीला सुरुवात - पुण्यातील कसबा मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस पक्षाने मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. दुसरीकडे भारतीय जनता पक्षातील इच्छुक उमेदवारांनी देखील मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. कसबा मतदार संघातून काँग्रेस निवडणूक लढवत असल्याने महाविकास आघाडी काय निर्णय घेणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

कसब्यातील बाजी कोण मारणार? - दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या विरोधात काँग्रेसचे अरविंद शिंदे, मनसेकडून अजय शिंदे यांनी निवडणूक लढवली होती. आत्ता कसब्यातील जागा ही राष्ट्रवादीकडे जाणार की काँग्रेसकडे हे पाहणे देखील महत्त्वाचे असणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून नाना काटे आज उमेदवारी अर्ज भरणार आहे. काँग्रेसकडून रविंद्र धंगेकर यांनी उमेदवारी अर्ज भरला असल्याचे सांगितले जात आहे. भाजपकडून हेमंत रासने यांनी अर्ज भरला. कसब्यातील बाजी कोण मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे, या निवडणूकीत अटीतटीची लढत होणार असल्याचे दिसून येत आहे.

कसबा मतदार संघाच्या आमदार मुक्ता टिळक यांचे अल्पशा आजाराने 22 डिसेंबर रोजी निधन झाले होते. टिळक या भारतीय जनता पक्षाकडून 4 वेळा नगरसेवक, एकदा महापौर तसेच सध्या आमदार म्हणून कार्यरत होत्या. मुक्ता टिळक यांना टिळक घराण्यातील पहिल्या महापौर होण्याचा मान मिळाला होता. पुण्यात 2017 च्या महापालिका निवडणुकीत भाजपाला स्पष्ट बहुमत मिळाले होते. महापालिकेच्या इतिहासात भाजपाची प्रथमच सत्ता आल्यानंतर भाजपाच्या पहिल्या महापौर होण्याचा मान मुक्ता टिळक यांना मिळाला होता. त्यांनी 2019 मध्ये कसबा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती.

पिंपरी-चिंचवडचे आमदार : पिंपरी-चिंचवडचे भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांचे कर्करोगामुळे निधन झाले आहे. त्यांनी वयाच्या 59 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. जगताप हे कर्करोगाची झुंज देत होते. मागील काही दिवसांपासून त्यांच्यावर पुण्याच्या ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. लक्ष्मण जगताप हे तीन टर्म पिंपरी-चिंचवडचे आमदार राहिले आहे.

हेही वाचा : Municipal Elections: संस्थांच्या निवडणुकांबाबत सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी; महापालिका निवडणुकांचा मार्ग मोकळा होणार का?

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.