पुणे - विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात आक्षेपार्ह आणि बदनामीकारक वक्तव्य करणाऱ्या आरोपीला पिंपरी-चिंचवड पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. फडणवीस यांच्याबाबत आक्षेपार्ह मजकुरासह काही आरोप युवराज दाखले नावाच्या व्यक्तीने एका व्हिडिओच्या माध्यमातून केल्याचे समोर आले होते. याप्रकरणी भाजपच्या अनुसूचित जाती मोर्चा प्रदेश सदस्या कोमल शिंदे यांनी तक्रार दिली होती. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचनेनंतर त्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे.
विधानसभेत देखील उमटले होते पडसाद-
या आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणी गुरुवारी विधानसभेत याचे पडसाद उमटल्याचे चित्र पाहायला मिळाले. शिवाय, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संबंधित व्यक्तीवर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन दिले होते.
आक्षेपार्ह आरोप करणाऱ्या त्या व्यक्तीला बेड्या-
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवड शहरात राहणाऱ्या युवराज दाखले याने विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्री काळाचा उल्लेख करत आक्षेपार्ह आरोप केले होते. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. याप्रकरणी गुरुवारी विधानसभेत याचे पडसाद उमटले होते. त्यानुसार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आश्वासन देत संबंधित व्यक्तीवर योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे सभागृहात सांगितले होते. त्यानंतर गुरुवारी आरोपी युवराज दाखले याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. घटनेचा अधिक तपास वाकड पोलीस करत आहेत.
देवेंद्र फडणवीस यांच्यावर आक्षेपार्ह आरोप करणाऱ्या 'त्या' व्यक्तीला बेड्या - राष्ट्रवादीचा कार्यकर्ता अटक
पिंपरी-चिंचवड शहरात राहणाऱ्या युवराज दाखले याने विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्री काळाचा उल्लेख करत आक्षेपार्ह आरोप केले होते. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.