ETV Bharat / state

राष्ट्रवादी युवक काँग्रेसने केला पंतप्रधान मोदींचा वाढदिवस 'राष्ट्रीय बेरोजगार दिन' म्हणून साजरा

पिंपरी येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिन राष्ट्रीय बेरोजगार दिन म्हणून साजरा केला.

आंदोलक
आंदोलक
author img

By

Published : Sep 17, 2020, 8:03 PM IST

पिंपरी-चिंचवड (पुणे) - केंद्र सरकारच्या चुकीच्या ध्येय धोरणामुळेच देशाचा जीडीपी (सकल राष्ट्रीय उत्पादन) उणे तेवीस पेक्षाही जास्त खाली गेला आहे. 2014 साली कॉंग्रेसच्या राजवटीत 10.8 असणाऱ्या जीडीपी निर्देशांकाने इतिहासातील सर्वात निचांकी पातळी गाठली आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीतील भाजपच्या प्रचाराला भुलून देशातील बेरोजगार युवकांनी भाजप व मोदींवर विश्वास दाखवून त्यांना मतदान केले. तेव्हापासून नव रोजगार निर्मिती ऐवजी बेरोजगारीत वाढ झाली. सर्व सुशिक्षित बेरोजगारांचा भ्रमनिरास झाला आहे. त्यामुळे सर्व बेरोजगार युवक 17 सप्टेंबर हा दिवस राष्ट्रीय बेरोजगार दिन म्हणून साजरा करत आहेत आणि केंद्र सरकारच्या भांडवलदार पुरक धोरणाचा तीव्र निषेध करीत आहेत, अशी टिका राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष विशाल वाकडकर यांनी केली.

बोलताना विशाल वाकडकर
पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात राष्ट्रवादीचे शहराध्यक्षांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय बेरोजगार दिन साजरा करण्यात आला. केंद्र सरकारच्या विरोधात राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसने घोषणाबाजी केली. यावेळी विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, राष्ट्रवादी युवक प्रदेश सरचिटणीस विशाल काळभोर, शिक्षण मंडळाचे माजी सभापती विजय लोखंडे, किरण देशमुख, भागवत जवळकर, अक्षय म्हात्रे, मयुर जाधव, हर्षवर्धन भोईर, प्रतिक साळुंखे, प्रसाद कोलते, सईफ खान,चेतन फेंगसे, निखिल दळवी, समिर वाघज, गौरव शितोळे, सनी डहाळे, शादाब खान, अमोल पाटील, श्रेयस चिखले, दिनेश पटेल, संकेत इंगवले, रमणदीप कोहली, श्याम जगताप, बाळासाहेब पिल्लेवार,आदी उपस्थित होते.

यावेळी वाकडकर म्हणाले की, केंद्र सरकारची धोरणे ही भांडवलदार पुरक आहेत. त्यामुळेच केंद्र सरकारच्या कोणत्याही सार्वजनिक उद्योगापेक्षा अंबांनींची संपत्ती जास्त आहे. रेल्वे, विमानतळ यांचे खासगीकरण करुन आता एलआयसीतील 25 टक्के सरकारी हिस्सा देखील यांनी विकायला काढला आहे. सार्वजनिक उद्योगात भांडवली गुंतवणूक वाढवण्याऐवजी त्यांचे खासगीकरण करण्याचा उद्योग हे सरकार करत आहे. दरवर्षी दोन कोटी रोजगार उत्पन्न करण्याचे भाजपने आश्वासन दिले होते. पण, भाजप सरकारच्या धोरणांमुळेच रोजगार संपुष्टात येणार आहे. वीस लाख कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर करुन चार महिने झाले तरी अद्यापपर्यंत एकाही व्यक्तीला वा उद्योजकाला याचा लाभ मिळाल्याचे उदाहरण नाही. निवडणूक प्रचारात दिलेल्या फसव्या आश्वासनांप्रमाणेच ही देखील फसवी घोषणा आहे काय? कोरोनाचे नाव पुढे करत आपले अपयश झाकण्याचाच केंद्र सरकारचा व पंतप्रधान मोदी यांचा हा केविलवाणा प्रयत्न आहे, अशी टीका विशाल वाकडकर यांनी केली.

हेही वाचा - 2 लाखांची बुलेट 15 हजारांना विकणारा 'बुलेट राजा' जेरबंद; फेसबुकवरून करायचे डील

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.