ETV Bharat / state

गॅस दरवाढीविरोधात राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे आंदोलन

अर्थसंकल्पानंतर केंद्र सरकारने गॅसच्या किंमतीत 25 रुपयाने वाढ केली. याविरोधात राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने महात्मा फुले मंडईत केंद्र सरकार विरोधात चूल पेटवून तीव्र आंदोलन करण्यात आले आहे. यावेळी आंदोलक महिलांकडून केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

author img

By

Published : Feb 6, 2021, 4:55 PM IST

पुणे - अर्थसंकल्पानंतर केंद्र सरकारने गॅसच्या किंमतीत 25 रुपयाने वाढ केली. याविरोधात राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने महात्मा फुले मंडईत केंद्र सरकार विरोधात चूल पेटवून तीव्र आंदोलन करण्यात आले आहे. यावेळी आंदोलक महिलांकडून केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

गॅस दरवाढीविरोधात राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे आंदोलन
दरवाढ कमी करा अन्यथा तीव्र आंदोलन देशाच्या अर्थव्यवस्थेत जनतेला अनेक अपेक्षा होत्या. मात्र मोदी सरकारने सादर केलेल्या अर्थव्यवस्थेत जनतेच्या अपेक्षांवर पाणी फेरण्याचं काम मोदी सरकारने केलं आहे.आणि लगेच गॅसच्या किंमतीत 25 रुपयांनी वाढ करून जनतेला महागाईचा अजून एक दणका दिला आहे. सत्तेत येण्यापूर्वी पंतप्रधानांनी सांगितले होते की कोणत्याही जीवनावश्यक वस्तूंमध्ये वाढ करणार नाही. मात्र तरीही सातत्याने गॅस दरवाढ केली जात आहे. त्यामुळे राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्यावतीने आंदोलन करण्यात येत आहे. ही दरवाढ आम्हा महिला भगिनींसाठी आर्थिक बजेट कोसळवणारी आहे. म्हणून आम्ही या दरवाढीचा निषेध करतो. लवकरात लवकर दरवाढ कमी नाही केली तर यापुढे राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्यावतीने तीव्र आंदोलन करू, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला शहराध्यक्ष स्वाती पोकळे यांनी व्यक्त केले.केंद्र सरकारची भूमिका अन्यायकारककेंद्र सरकारने केलेली गॅस दरवाढ कमी करावी. केंद्र सरकारने कोरोना काळात तरी जीवनावश्यक वस्तूंचे भाव स्थिर ठेवायला हवे. दरवाढीने महिलांचे आर्थिक बजेट कोसळत आहे. केंद्र सरकार फक्त घोषणा करत आहे. प्रत्येक्षात तर काहीच करत नाही.केंद्र सरकार अनेक अन्यायकारक भूमिका घेत असून राष्ट्रवादी महिलाकाँग्रेस याच विरोध करत आहे, असे ही यावेळी स्वाती पोकळे म्हणाल्या.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.