पुणे: पोलिसांकडून मागील पाच महिन्यात कोकेनचे 4 गुन्हे दाखल झाले. यात 198 ग्रॅम कोकेन जप्त करण्यात आले असून यात 5 आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर गांजाच्या बाबतीत 18 गुन्हे दाखल झाले असून जवळपास 184 किलो गांजा जप्त केला गेला. यात 21 आरोपींना अटक करण्यात आली आहे. ब्राऊन शुगर / हेरॉईनचा एक गुन्हा दाखल झाला. 336 ग्रॅम ब्राऊन शुगर / हेरॉईन जप्त करण्यात आली. यात एका आरोपीला अटक करण्यात आली. हेरॉईनची किंमत ही 4 लाख 33 हजार 200 रुपये एवढी आहे. कारवाई दरम्यान अफिमचे बोंडे / दोडाचुरा 5 किलो जप्त करण्यात आले आहे. या घटनेत एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.
एवढे ड्रग्ज जप्त: चरस बाळगण्याचे एकूण 4 गुन्हे दाखल झाले असून तब्बल 3 किलो 285 ग्रॅम चरस जप्त करण्यात आले आहे. तर यात 6 आरोपींना अटक करण्यात आली. जप्त चरसची किंमत जवळपास 42 लाख 68 हजार 940 एवढी आहे. तसेच मेफेड्रोनचे (एम.डी.) 17 गुन्हे दाखल झाले असून जवळपास 1 किलो 717 ग्रॅम एम. डी. जप्त करण्यात आले. यात 25 आरोपींना अटक करण्यात आली आहे. याची साधारणतः किंमत ही 3 कोटी 43 लाख 79 हजार 400 रुपये इतकी आहे. एल.एस.डी. बाबत एक गुन्हा दाखल केला गेला. यात 9 मिलिग्रॅम एल.एस.डी. ताब्यात घेण्यात आले. यात एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. एम.डी.एम.ए. बाबत एक गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी 13 ग्रॅम एम.डी.एम.ए जप्त केले. याप्रकरणी 3 आरोपींना अटक करण्यात आली आहे. कॅथा इडुलिस (खत) बाबत 2 आरोपींना अटक केली गेली.
नागरिकांना आवाहन: गुन्हे शाखेचे उपायुक्त अमोल झेंडे म्हणाले की, पुणे पोलिसांकडून अंमली पदार्थाची जी तस्करी होत आहे त्याविरोधात मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात येत आहे. शहरात या पाच महिन्यात जवळपास 7 कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहे. हे पदार्थ शरीराला घातक असून यामुळे कॅन्सर देखील होण्याची शक्यता आहे. अशी तस्करी आढळून आल्यास तात्काळ पुणे पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन देखील त्यांनी केले आहे.
हेही वाचा: