ETV Bharat / state

रेमडेसिवीर 25 हजाराने विकणाऱ्या तिघांना अटक, आरोपीचा नातेवाईक डॉक्टर पोलिसांच्या रडारवर - खोपोली रेमडेसीवीर काळाबाजार न्यूज

रेमडेसिवीर इंजेक्शन वाढीव दराने म्हणजेच 25 हजार रूपयांनी विकणाऱ्या तिघांना अटक करण्यात आली आहे. नारायणगाव पोलिसांनी ही कारवाई केली आहे. तसेच, रुग्णाच्या असहाय्यतेचा फायदा घेऊन कोण अवैध मार्गाने आणखी रेमडेसिवीरची विक्री करत असेल, तर त्याची माहिती पोलीस ठाण्याला द्यावी. त्याचे नाव गुप्त ठेवले जाईल, असे सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनी म्हटले आहे.

pune
पुणे
author img

By

Published : Apr 30, 2021, 8:31 PM IST

नारायणगाव - कोरोना रूग्णांवरील उपचारासाठी वापरले जाणारे रेमडेसिवीर इंजेक्शन वाढीव दराने व अवैध मार्गाने विक्री करणाऱ्या खोपोली येथील 3 तरूणांना पुणे जिल्ह्यातील नारायणगाव पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून 9 इंजेक्शन जप्त केले आहेत. अटक आरोपींपैकी एक आरोपी खोपोली येथे कोविड उपचार केंद्र चालवणाऱ्या डॉक्टरचा नातेवाईक आहे. आरोपींना जुन्नर न्यायालयाने 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनी दिली.

रेमडेसिवीर 25 हजाराने विकणाऱ्या तिघांना अटक

स्वप्निल सुनिल देशमुख (गुरव) (वय 19), आकाश प्रकाश कलवार (वय 15) आणि विनोद जगदीशप्रसाद जाकोटीया (वय ४०) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. ते सर्वजण रायगडच्या खालापूर तालुक्यातील खोपोली येथील आहेत.

25 हजाराला विकायचे रेमडेसिवीर

या बाबत सहायक पोलीस निरीक्षक ताटे म्हणाले, की पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखा विभागाच्या पथकाने 24 एप्रिल 2021 रोजी वारूळवाडी (ता. जुन्नर) येथे अवैध मार्गाने रेमडेसिवीरची 45 हजार रुपयांना विक्री करताना रोहन शेखर गणेशकर (वय २९, रा. वाणेवाडी, ता. जुन्नर) या तरुणाला अटक केली होती. त्याच्याकडून 3 इंजेक्शन, मोबाइल असा 21 हजार 890 रूपयांचा ऐवज जप्त केला होता. पुढील तपासात रोहन याने रेमडेसिवीर इंजेक्शनची खरेदी खोपोली येथील संबंधित आरोपींकडून 25 हजार रुपयांना एक या प्रमाणे केल्याची माहिती मिळाली. त्यानुसार गुरूवारी (29 एप्रिल) रात्री खोपोली येथून स्वप्निल देशमुुख, आकाश कलवार आणि विनोद जाकोटीया यांना ताब्यात घेतले. चौकशीत गरजूंना व रुग्णांच्या नातेवाईकांना रेमडेसिवीरची 25 हजार रुपयांना एक या प्रमाणे विक्री करत असल्याचे समोर आले. तसेच, रोहन गणेशकरला इंजेक्शन अवैध मार्गाने विकल्याचे समोर आले. यावरून त्या 3 आरोपींना अटक करण्यात आली.

आरोपींकडून 9 इंजेक्शन जप्त करण्यात आले. प्राथमिक चौकशीत विनोद जाकोटीया याचा खोपोली येथे सिमेंट विक्रीचा व्यवसाय आहे. त्याचा नातेवाईक असलेल्या डॉक्टरचे खोपोली येथे कोविड उपचार केंद्र आहे. पुढील तपासात आरोपी रेमडेसिवीर इंजेक्शनची खरेदी कोठून करत होते? हे निष्पन्न होणार आहे. या टोळीत काही डॉक्टरचा सहभाग असल्याची शक्यता आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक देशमुख, अप्पर पोलीस अधिक्षक विवेक पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे, धनंजय पालवे, शैलेश वाघमारे, सचिन कोबल यांच्या पथकाने केली.

दरम्यान, या टोळीने, अन्य औषध विक्रेते, डॉक्टर अथवा अन्य व्यक्तींनी रुग्णाच्या असहाय्यतेचा फायदा घेऊन अवैध मार्गाने आणखी कोणाला रेमडेसिवीरची विक्री केली असेल, तर संबंधित व्यक्तींनी नारायणगाव पोलीस ठाण्यात (मोबाइल क्रमांक 9922448100) संपर्क साधावा. माहिती देणाराचे नाव गुप्त ठेवले जाईल, असे पृथ्वीराज ताटे यांनी म्हटले आहे.

हेही वाचा - बुध्दीजीवी लोक भारताची प्रतिमा खराब करीत आहेत - कंगना रणौत

हेही वाचा - कोरोनावरून समाज माध्यमातून तक्रार करणाऱ्या नागरिकांवर कारवाई करू नका- राज्यांना 'सर्वोच्च' आदेश

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.