पुणे - पिंपरी-चिंचवडमध्ये महिला आणि पुरुषाचा लॉजमध्ये नग्नावस्थेत मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. ही घटना आज सकाळी उघडकीस आली आहे. प्रेम प्रकरणातून हत्याचे घडल्याचे दिघी पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
प्रथमदर्शी तरुणाने लॉजमध्ये महिलेचा खून करून आत्महत्या केला असल्याचे सांगण्यात येत आहे. प्रकाश ठोसर ( 30 ) असे खून करून आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. महिलेचा विवाह झाला असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
हेही वाचा-Nagpur : विद्यार्थिनीवर गोळीबार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला अटक
विवाहित महिलेबरोबर होते संबंध-
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिघी परिसरातील लॉजवर पुरुष आणि महिलेचा लग्नावस्थेत मृतदेह ( couple dead bodies in Dighi lodge ) मिळाला आहे. प्रकाश ठोसर असे गळफास घेतलेल्या तरुणाचे नाव आहे. त्याचे 30 वर्षीय विवाहित महिलेसोबत प्रेमसंबंध होते, असे पोलिसांनी सांगितले सांगितले आहे. ते दिघी परिसरातील लॉजवर नेहमी भेटायचे. आज सकाळी दोघांचा मृतदेह लॉजमधील रूमवर आढळला आहे. प्रकाश ठोसरने प्रेयसीचा खून करून स्वतः आत्महत्या केला असल्याचा अंदाज दिघी पोलिसांनी व्यक्त केला आहे.
हेही वाचा-Infant sale नवजात बालकांची खरेदी-विक्री करणाऱ्या डॉक्टरला बेड्या; 'हा' धक्कादायक प्रकार आला समोर
ठाण्यात जन्मदात्या पित्याकडून मुलीवर अत्याचार-
बाप-लेकीच्या पवित्र नात्याला काळीमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. जन्मदात्या पित्यानेच आपल्या 13 वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याचा प्रकार शहापूर तालुक्यात एका पाड्यातील वस्तीत समोर आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे पीडितेचा गर्भपात झाल्याने ही घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात नराधम पित्याविरोधात विविध कलमासह अत्याचार व पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला तत्काळ बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.