पुणे - जिल्ह्यातील भगतवाडी गावातल्या जळीत ग्रस्तांच्या मदतीसाठी नाना पाटेकर यांच्या नाम फाऊंडेशनने पुढाकार घेतला आहे. भगतवाडी गावात तीन दिवसांपूर्वी पहाटेच्या सुमारास आग लागली होती. या आगीत 14 घरे पुर्णतः जळून खाक झाल्याने ग्रामस्थांचे नूकसान झाले होते. या भीषण आगीमुळे जळीतग्रस्तांचे संसार उघड्यावर आले होते. मात्र, आता या गावातील जळीत ग्रस्त कुटुंबांची जबाबदारी अभिनेते नाना पाटेकर यांच्या नाम फाऊंडेशनने घेतली आहे.
हेही वाचा - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात कडक नियम लागू; राज्य सरकारचे अध्यादेश
गावकऱ्यांना मोठा दिलासा -
अभिनेते नाना पाटेकर यांनी नुकतीच या गावाला भेट दिली. तसेच येथील परिस्थितीची, जळालेल्या घरांची पाहणी केली. ज्या नागरिकांचे नुकसान झाले त्यांची विचारपूस केली. यावेळी नाना यांनी गावकऱ्यांना आश्वस्त केले. आता नाम फाऊंडेशनच्या माध्यमातून या गावकऱ्यांना संसारपयोगी सर्व मदत केली जाणार आहे. यामुळे गावकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
हेही वाचा - एमपीएससी आंदोलनाचा फटका; पाच पोलीस अधिकारी कोरोनाबाधित
भगतवाडी गावात 14 तारखेला मध्यरात्री आग लागली होती. या आगीत एका पाठोपाठ एक अशी 14 घरे आगी भस्मसात पडली. यावेळी गावकऱ्यांना वेळीच घराबाहेर काढण्यात आले होते. मात्र घरातील साहित्य, संसारपयोगी वस्तू पूर्णपणे जळून खाक झाले. आता ज्या गावकऱ्यांची घरे जळाली आहेत त्या कुटुंबाना नाम फाऊंडेशन हे घर बांधण्यासाठी आर्थिक मदत करणार आहे.