ETV Bharat / state

Kasba By Elections 2023: दोन तारखेला गुलाल मीच उधळणार- रवींद्र धंगेकरांचा दावा

कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणुकीच्या मतदानाला आज सकाळपासून सुरवात झाली आहे. सकाळी 7 ते 5 वाजेपर्यंत मतदान होणार आहे. सकाळपासूनच नागरिक आपला हक्क बजावण्यासाठी येत आहे. मतदानासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. प्रत्येक बूथवर मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. 2 तारखेला मीच गुलाल उधळणार आहे, असे देखील यावेळी रवींद्र धंगेकर म्हणाले.

Kasba By Elections 2023
रवींद्र धंगेकर
author img

By

Published : Feb 26, 2023, 9:00 AM IST

प्रतिक्रिया देताना रवींद्र धंगेकर

पुणे : कसबा पेठ विधानसभा मतदार संघात आज सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरवात झाली आहे. या मतदार संघामध्ये एकूण २ लाख ७५ हजार ६७९ मतदार आहे. २७० मतदान केंद्रावर मतदान होणार आहे. मतदान प्रक्रियेसाठी १ हजार २५० अधिकारी-कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. प्रत्येकी १० याप्रमाणे २७ टेबलवर मतदान साहित्याचे वाटप करण्यात आले. गेल्या 30 वर्षापासून मी राजकारणात आहे. यंदाच्या या पोट निवडणुकीत पहिल्याच दिवसापासून जनतेने ही निवडणूक हातात घेतली आहे. पैसे नव्हे तर मनापासून जनता माझ्यामागे आहे. मीच ही निवडणूक जिंकणार असल्याचे यावेळी धंगेकर यांनी सांगितले आहे.

रवींद्र धंगेकर यांची मालमत्ता : कसबा विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीतील काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर आणि त्यांच्या पत्नीकडे एकूण 8 कोटी 36 लाख 10 हजार रुपयाची स्थावर जंगम मालमत्ता आहे. 25 तोळे सोने, तसेच धंगेकर यांच्या नावे 35 लाख 73 हजार रुपयांचे कर्ज आहे. तर पत्नींच्या नावावर 32 लाख 8 हजार रुपयांचे कर्ज आहे. त्यांच्यावर एकूण नऊ प्रलंबित खटले आहेत. रवींद्र धंगेकर यांच्या रविवार पेठ मंगळवार पेठ कसबा पेठ आणि शिवाजीनगर येथे सदनिका आहेत. दौंड तालुक्यात शेती असून कोथरूड येथे 4,500 चौरस फुटाची जागा आहे. पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाचे उत्सव प्रमुख अक्षय गोडसे यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांना जाहीर पाठिंबा दिला आहे.

सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल : रवींद्र धंगेकर यांनी सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यासोबत जोडलेल्या शपथपत्रात संपत्तीविषयी माहिती देण्यात आली होती. धंगेकर यांचे आर्थिक वर्षातील उत्पन्न 3 लाख 36 हजार रूपये इतके आहे. त्यांच्या शेती व सोने चांदी कारागिरी बांधकाम हा व्यवसाय आहे. त्यांचे शिक्षण आठवीपर्यंत झालेले आहे. त्यांची जंगम मालमत्ता 47 लाख 6 हजार 128 रुपये तर पत्नीकडे 68 लाख 67 हजार 376 रुपयाची मालमत्ता आहे. त्यांची स्थावर मालमत्ता 4 कोटी 59 लाख 27 हजार 916 रुपये आहे. धंगेकर यांच्या पत्नीकडे 2 कोटी 60 लाख 72 हजार 994 रुपयाची स्थावर मालमत्ता आहे. धंगेकर यांच्याकडे दोन दुचाकी 10 तोळे सोने तर पत्नीकडे 15 तोळे सोने आहे.

हेही वाचा : Kasba By Election 2023 : कसबा पोटनिवडणूक; मतदारसंघाचा असा आहे इतिहास...

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.